Maharashtra IPS Promotion Transfer Postponed | 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने पदस्थापनेस अवघ्या 12 तासांत स्थगिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra IPS Promotion Transfer Postponed | महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदली आणि पदोन्नतीचे आदेश बुधवारी (दि.20) रात्री काढण्यात आले होते.
परंतु आदेश काढून 12 तास होत नाहीत तोच 5 अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने पदस्थापनेच्या आदेशाला स्थगिती (Maharashtra IPS Promotion Transfer Postponed) देण्यात आली आहे.
पुढच्या आदेशापर्यंत 5 अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीला स्थगिती देण्यात आली आहे.

 

मुंबई (Mumbai) आणि ठाण्यातील (Thane) पोलीस अधीक्षक (SP), पोलीस उपायुक्तांसह (DCP) पाच जणांना अप्पर पोलीस आयुक्तपदी (Addl CP) बढती दिली होती.
त्याचे आदेश देखील गृहविभागाकडून (Maharashtra Home Department) काढण्यात आले होते.
मात्र, 12 तास उलटत नाहीत तोच या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. (Maharashtra IPS Promotion Transfer Postponed)

 

स्थगिती दिलेल्या अधिकाऱ्यांची नावे

1. राजेंद्र माने IPS Rajendra Mane (उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई DCP State Intelligence Department, Mumbai
ते अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, ठाणे शहर Addl CP Thane)

2. महेश उ. पाटील IPS Mahesh U. Patil (पोलीस उपायुक्त, मिरा – भाईंदर – वसई – विरार पोलीस आयुक्तालय DCP Mira Bhayander – Vasai – Virar Police Commissionerate ते अपर पोलीस आयुक्त (वाहतूक – Traffic), बृहन्मुंबई – Brihanmumbai)

3. संजय बी जाधव IPS Sanjay B Jadhav (पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, पुणे SP Highway Safety Squad, Pune
ते अपर पोलीस आयुक्त (प्रशासन – Administration), ठाणे शहर

4. पंजाबराव उगले IPS Punjabrao Ugle (पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे ते अपर पोलीस आयुक्त,
सशस्त्र पोलीस (Local Arms), बृहन्मुंबई)

Advt.

5. दत्तात्रय शिंदे  IPS Dattatraya Shinde (पोलीस अधीक्षक, पालघर SP Palghar ते अपर पोलीस आयुक्त, संरक्षण व सुरक्षा, बृहन्मुंबई)

 

Web Title :- Maharashtra IPS Promotion Transfer Postponed

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा