Maharashtra IPS Transfer | आयपीएस अनिल पारसकर, अभिनव देशमुख, सारंग आव्हाड, शशिकुमार मीना, प्रविण पाटील, अरविंद चावरिया यांच्यासह 10 जणांना पोलिस उप महानिरीक्षक पदी बढती

IPS दीपक साकोरे नवी मुंबईचे नवे अप्पर पोलिस आयुक्त (गुन्हे)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra IPS Transfer | राज्य गृह विभागाने (Maharashtra Home Dept) सोमवारी राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. आयपीएस अधिकारी अनिल पारसकर (IPS Anil Paraskar), अभिनव देशमुख (IPS Dr. Abhinav Deshmukh), सारंग आव्हाड (IPS Sarang Awad), प्रविण पाटील (IPS Pravin Patil), अरविंद चावरिया (IPS Arvind Chavaria) यांच्यासह 10 आयपीएस अधिकार्‍यांना पोलिस उप महानिरीक्षक (अप्पर पोलिस आयुक्त) पदी बढती देण्यात आली आहे. पदोन्नतीवर त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, पोलिस उप महानिरीक्षक असलेले दीपक साकोरे (IPS Deepak Sakore) आणि पोलिस उप महानिरीक्षक विरेंद्र मिश्रा (IPS Veerendra Mishra) यांची अनुक्रम बदली आणि नियुक्ती करण्यात आली आहे. (Maharashtra IPS Transfer)

 

बदली झालेल्या पोलिस उप महानिरीक्षकाचे नव आणि त्यापुढील कंसात पदस्थापना पुढील प्रमाणे

1. विरेंद्र मिश्रा (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते अप्पर पोलिस आयुक्त, विशेष शाखा, बृहन्मुंबई)

2. दीपक साकोरे (पोलिस उप महानिरीक्षक, रा.रा. पोलिस बल, पुणे ते अप्पर पोलिस आयुक्त, गुन्हे, नवी मुंबई)

 

पदोन्नतीवर बदली झालेल्या पोलिस अधीक्षकांचे नाव आणि त्यापुढील कंसात पदोन्नतीचे पद आणि पदस्थापना पुढील प्रमाणे आहे. (Maharashtra IPS Transfer)

1. अभिनव डी. देशमुख (पोलिस उप आयुक्त, बृहन्मुंबई ते अप्पर पोलिस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई)

2. अनिल एस पारसकर (पोलिस उप आयुक्त, बृहन्मुंबई ते अप्पर पोलिस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई)

3. एम. रामकुमार IPS M. Ramkumar (पोलिस उप आयुक्त, बृहन्मुंबई ते अप्पर पोलिस आयुक्त, वाहतूक, बृहन्मुंबई)

4. शशिकुमार मीना IPS Shashi Kumar Meena (समादेशक, रा.रा. पोलिस बल, गट क्र.8, मुंबई ते अप्पर पोलिस आयुक्त, गुन्हे, बृहन्मुंबई)

5. प्रवीण सी. पाटील (समादेशक, रा.रा. पोलिस बल, गट क्र. 1, पुणे ते अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर)

6. संजय बी. पाटील IPS Sanjay B. Patil (पोलिस उप आयुक्त, बृहन्मुंबई ते अप्पर पोलिस आयुक्त, गुन्हे, नागपूर शहर)

7. वसंत के. परदेशी IPS Vasant K. Pardeshi (समादेशक, रा.रा. पोलिस बल, गट क्र. 7, दौंड, जि. पुणे ते अप्पर पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड)

8. सारंग डी. आव्हाड (पोलिस अधीक्षक, बुलढाणा ते पोलिस उप महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)

9. पी. पी. शेवाळे IPS P.P. Shewale (कार्यकारी संचालक (सु. व अ.), मराविवि कंपनी मर्या, मुंबई ते अप्पर पोलिस आयुक्त, उत्तर विभाग, नागपूर शहर)

10. अरविंद एच. चावरिया (पोलिस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे ते अप्पर पोलिस आयुक्त, प्रशासन, पुणे शहर)

 

Web Title :- Maharashtra IPS Transfer | 10 Officers including IPS Anil Paraskar, IPS Abhinav Deshmukh, IPS Sarang Awad, IPS Pravin Patil promoted as Deputy Inspector General of Police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | पिसोळीत ज्येष्ठ नागरिकाचा खून, कोंढवा पोलिसांकडून तासाभरात मारेकरी गजाआड

Dr. Nivedita Bhide | ‘गोष्टी, गोष्टी,पन्नास गोष्टी !’ पुस्तक संचाचे प्रकाशन – गोष्टींमुळे भाव जागरण व्हावे, दिशा मिळावी : डॉ. निवेदिता भिडे

CM Eknath Shinde | ‘झोळी लटकवून निघून जाशील…’, उद्धव ठाकरेंच्या पंतप्रधानांवरील टीकेला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर, म्हणाले… (व्हिडिओ)