Maharashtra IPS Transfer | डॉ. संजय शिंदे पिंपरी-चिंचवडचे नवे पोलिस सह आयुक्त ! आयपीएस अनिल कुंभारे, संजय दराडे, अशोक मोराळे, राजेंद्र डहाळे, जालिंदर सुपेकर यांच्यासह 12 अधिकार्‍यांना IG पदी बढती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra IPS Transfer | राज्य गृह विभागाने (Maharashtra Home Dept) सोमवारी सायंकाळी राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बढतीवर बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये पोलिस अधीक्षक (SP), पोलिस उप महानिरीक्षक (DIG) आणि पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या (IG) अधिकार्‍यांचा समावेश आहे. पोलिस उप महानिरीक्षक (अप्पर पोलिस आयुक्त) डॉ. संजय शिंदे (IPS Dr. Sanjay Shinde) यांची पिंपरी-चिंचवडच्या पोलिस सह आयुक्त पदी (Jt CP Pimpri Chinchwad) नियुक्ती करण्यात आली आहे.

 

दरम्यान, पोलिस उप महानिरीक्षक अनिल कुंभारे (IPS Anil Kumbhare), संजय दराडे (IPS Sanjay Darade), अशोक मोराळे (IPS Ashok Morale), राजेंद्र डहाळे (IPS Rajendra Dahale), डॉ. जालिंदर सुपेकर (IPS Dr. Jalindar Supekar) यांच्यासह 12 अधिकार्‍यांना विशेष पोलिस महानिरीक्षक पदी बढती देण्यात आली आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवडचे पोलिस सह आयुक्त मनोज लोहिया (IPS Manoj Lohiya) यांची छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक के. एम.एम. प्रसन्ना (IPS K. M M Prasanna) यांची पोलिस महासंचालक कार्यालयात विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) येथे बदली करण्यात आली आहे. (Maharashtra IPS Transfer)

 

बदली झालेल्या विशेष पोलिस महानिरीक्षकाचे नाव आणि त्यापुढे पदस्थापना पुढील प्रमाणे –

1. के. एम.एम. प्रसन्ना (आयजी, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र ते आयजी, आस्थापना, डीजी ऑफिस, मुंबई)

2. मनोज लोहिया Chhatrapati Sambhajinagar CP Manoj Lohiya (पोलिस सह आयुक्त, पिंपरी-चिंचवड ते पोलिस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर)

पदोन्नतीवर बदली झालेल्या पोलिस उप महानिरीक्षकाचे नाव आणि त्यापुढील कंसात पदोन्नतीचे पद आणि पदस्थापना पुढील प्रमाणे (Maharashtra IPS Transfer) –

1. संजय दराडे (अप्पर पोलिस आयुक्त, विशेष शाखा, बृहन्मुंबई ते आयजी, सीआयडी, पुणे)

2. अनिल डी. कुंभारे (अप्पर पोलिस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई ते आयजी, एटीएस, मुंबई)

3. महेश आर. घुर्ये IPS Mahesh Ghurye ( अप्पर पोलिस आयुक्त, गुन्हे, नवी मुंबई ते आयजी, रा.रा. पोलिस बल, पुणे)

4. डॉ. संजय एच. शिंदे (अप्पर पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड ते पोलिस सह आयुक्त, पिंपरी-चिंचवड)

5. डी.एस. चव्हाण IPS D.S. Chavan (अप्पर पोलिस आयुक्त, गुन्हे, बृहन्मुंबई ते आयजी, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र)

6. डी.आर. सावंत IPS D.R. Sawant (अप्पर पोलिस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई ते आयजी, सागरी सुरक्षा, मुंबई)

7. राजेंद्र बी. डहाळे (अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम विभाग, पुणे शहर ते संचालक, महाराष्ट्र गुप्तवार्ता अकादमी, पुणे)

8. अशोक आर. मोराळे (अप्पर पोलिस आयुक्त, गुन्हे, ठाणे शहर ते आयजी, रा.रा. पोलिस बल, नागपूर)

9. एस.एच. महावरकर IPS S.H.Mahavarkar (पोलिस उप महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र ते विशेष पोलिस महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र – पद उन्नत करून)

10. निसार तांबोळी IPS Nisar Tamboli (अप्पर पोलिस आयुक्त, वाहतुक, बृहन्मुंबई ते आयजी, प्रशासन, डीजी ऑफिस, मंबई)

11. एस. डी. येनपुरे IPS S.D. Yenpure (पोलिस उप महानिरीक्षक, वायरलेस, पुणे ते आयजी, सीआयडी, पुणे)

12. जालिंदर डी. सुपेकर (अप्पर पोलिस आयुक्त, प्रशासन, पुणे शहर ते आयजी, मुख्यालय, कारागृह विभाग, पुणे)

 

Web Title :- Maharashtra IPS Transfer | Dr. Sanjay Shinde is the new Joint Commissioner of Police of Pimpri-Chinchwad! 12 officers including IPS Anil Kumbhare, Sanjay Darade, Ashok Morale, Rajendra Dahale, Jalinder Supekar promoted as IG

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | पिसोळीत ज्येष्ठ नागरिकाचा खून, कोंढवा पोलिसांकडून तासाभरात मारेकरी गजाआड

Dr. Nivedita Bhide | ‘गोष्टी, गोष्टी,पन्नास गोष्टी !’ पुस्तक संचाचे प्रकाशन – गोष्टींमुळे भाव जागरण व्हावे, दिशा मिळावी : डॉ. निवेदिता भिडे

CM Eknath Shinde | ‘झोळी लटकवून निघून जाशील…’, उद्धव ठाकरेंच्या पंतप्रधानांवरील टीकेला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर, म्हणाले… (व्हिडिओ)