Maharashtra IPS Transfer | राज्यातील 31 आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या, अनेक जिल्हयातील पोलिस अधीक्षकांच्या (SP) बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Maharashtra IPS Transfer | राज्य गृह विभागाने आज पोलिस दलातील भारतीय पोलिस सेवेतील 31 पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक, पोलिस उपायुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त, पोलिस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश (Maharashtra IPS Transfer) आज काढण्यात आले आहेत.

आयपीएस अधिकार्‍यांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली हे पुढील प्रमाणे –

श्रीमती नीवा जैन (समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, गट-1, पुणे ते पोलिस अधीक्षक, उस्मानाबाद)

एस.व्ही. पाठक (समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, गट-7, दौंड, पुणे ते पोलिस उपायुक्त मुंबई शहर)

श्रीमती एन. अंबिका (पोलिस उपायुक्त, मुख्यालय -1, मुंबई शहर ते प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, मरोळ)

शशीकुमार मिना (पोलिस उपायुक्त, परिमंडळ-1, मुंबई शहर ते समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, गट-1, पुणे)

प्रविण सी. पाटील (पोलिस उपायुक्त (गुन्हे), नवी मुंबई ते पोलिस अधीक्षक, धुळे)

वसंत के. परदेशी (पोलिस अधीक्षक, वाशिम ते समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, गट-7, दौंड, पुणे)

श्रीमती विनीता साहु (पोलिस उपायुक्त, परिमंडळ-2, नागपुर शहर ते समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, गट-5, दौंड, पुणे)

शहाजी उमाप (पोलिस उपायुक्त, व्हीआयपी सुरक्षा, मुंबई शहर ते पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण)

एस.जी. दिवाण (पोलिस अधीक्षक, आर्थिक गुन्हे, सीआयडी, पुणे ते समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, गट-16, कोल्हापूर)

पंकज अशोकराव देशमुख (पोलिस उपायुक्त, पुणे शहर ते पोलिस अधीक्षक, आर्थिक गुन्हे, सीआयडी, पुणे)

श्रीमती मोक्षदा अनिल पाटील (पोलिस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण ते पोलिस अधीक्षक, लोहमार्ग, औरंगाबाद)

राकेश ओला (पोलिस अधीक्षक, नागपुर ग्रामीण ते पोलिस अधीक्षक, अ‍ॅन्टी करप्शन, नागपूर)

डॉ. हरी बालाजी एन. (पोलिस अधीक्षक, अमरावती ग्रामीण ते पोलिस उपायुक्त, मुंबई शहर)

महेंद्र पंडीत कमलाकर (पोलीस अधीक्षक, नंदुरबार ते पोलिस उपायुक्त, मुंबई शहर)

निलोत्पल (पोलिस उपायुक्त, नागपूर शहर ते पोलिस उपायुक्त, मुंबई शहर)

 

मनिष कलवानिया (अप्पर अधीक्षक, गडचिरोली ते उपायुक्त, नागपुर शहर)

डॉ. सुधाकर बी. पठारे (उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई ते उपायुक्त, ठाणे शहर)

अविनाश एम. बारगल (पोलिस अधीक्षक, एटीएस, औरंगाबाद ते पोलिस अधीक्षक, अमरावती ग्रामीण)

नंदकुमार टी. ठाकुर (पोलिस उपायुक्त, वाहतुक, मुंबई शहर ते पोलिस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, नांदेड)

नितीन पवार (पोलिस अधीक्षक, अनुसुचित जाती / अनुसुचित जमाती आयोग, मुंबई ते पोलिस उपायुक्त, मुंबई शहर)

दिगंबर पी. प्रधान (पोलिस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा, ठाणे ते दक्षता अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे)

तुषार सी. दोषी (प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, मरोळ ते पोलिस अधीक्षक, एटीएस, पुणे)

श्रीकांत एम. परोपकारी (उपायुक्त, विशेष कृती दल, गुन्हे शाखा, मुंबई शहर ते प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, नागपुर)

सचिन पाटील (पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण ते उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई)

 

चिन्मय पंडीत (पोलीस अधीक्षक, धुळे ते उपायुक्त, नागपुर शहर)

विजय मगर (उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई ते पोलिस अधीक्षक, नागपुर ग्रामीण)

निमीत गोयल (पोलिस उपायुक्त, सशस्त्र दल, मुंबई शहर ते पोलिस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण)

पी.आर. पाटील (पोलिस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, कोल्हापूर ते पोलिस अधीक्षक, नंदुरबार)

बच्चन सिंह (प्रतिक्षाधीन ते पोलिस अधीक्षक, वाशिम)

राज तिलक रोशन (पोलिस अधीक्षक, उस्मानाबाद ते पोलिस उपायुक्त, मुंबई शहर)

पवन बनसोड (समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, गट-13, नागपुर ते अप्पर पोलिस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण)

टीप –  राज्य पोलिस सेवतील निलेश अष्टेकर (दक्षता अधिकारी, पुणे महानगर विकास प्रदेश प्राधिकरण, पुणे) यांची या आदेशान्वये इतरत्र बदली करण्यात आली आहे. त्यांच्या पदस्थापनेबाबतचे आदेश स्वतंत्रपणे निर्ममीत करण्यात येणार आहेत.

 

Web Title : Maharashtra IPS Transfer | Transfers of 31 IPS officers in the state, transfers of Superintendents of Police (SPs) in several districts

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra IPS Transfer | राज्यातील 6 आयपीएस अधिकार्‍याची पदोन्नतीने पदस्थापना

Pune NCP | पालिकेतील सत्ताधाऱ्यांची ‘कायदेशीर’ गोची करणाऱ्या नगरसेवक अ‍ॅड. भय्यासाहेब जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदी निवड

Yusuf Lakdawala | मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर आणि ‘डी गँग’चा फायनान्सर युसूफ लकडावालाचा मुंबईच्या जेलमध्ये मृत्यू