Maharashtra Ironmen Launch Jersey for PHL | प्रीमिअर हँडबॉल लीगसाठी ‘महाराष्ट्र आयर्नमन’च्या जर्सीचे अनावरण!

जर्सी अनावरणाच्या भव्य समारंभात भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव याची उपस्थिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Ironmen Launch Jersey for PHL | ८ जून २०२३ पासून सुरू होणाऱ्या प्रीमिअर हँडबॉल लीगमध्ये Premier Handball League (PHL) भाग घेण्यासाठी सज्ज असलेल्या महाराष्ट्र आयर्नमॅन संघाने मंगळवारी पुण्यात एका शानदार कार्यक्रमात या हंगामासाठी त्यांच्या जर्सीचे अनावरण केले. यावेळी संघमालक पुनित बालन (Punit Balan) आणि क्रिकेटपटू केदार जाधव (Cricketer Kedar Jadhav) यांच्यासह मुख्य प्रशिक्षक सुनील कुमार (Head Coach Sunil Kumar) आणि सहायक प्रशिक्षक अजय कुमार (Assistant Coach Ajay Kumar) उपस्थित होते. केदार जाधव हे महाराष्ट्र आयर्नमेनचे चाहते आहेत. (Maharashtra Ironmen Launch Jersey for PHL)

 

हँडबॉल हा एक ऑलिम्पिक खेळ (Olympic Sport) असल्याने, तो पुनित बालन ग्रुपच्या (Punit Balan Group) दृष्टीक्षेपात आहे. त्यांची ही दृष्टी भारतात क्रिकेटेतर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि विकसित करण्याच्या उत्कटतेशी पूर्णपणे जुळते, जेणेकरून देश ऑलिम्पिक खेळांमध्ये नवीन उंची गाठू शकेल.

 

 

 

कार्यकमाला संबोधित करताना, पुनित बालन ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पुनित बालन म्हणाले की, “हँडबॉल हा एक ऑलिम्पिक खेळ आहे, हे आपण सर्व जाणतो आणि या खेळाला भारतात पुढच्या स्तरावर नेण्याचा आमचा दृष्टीकोन आहे. त्यामुळे आपले खेळाडू देखील या खेळात ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे आणि पदके जिंकण्याचे स्वप्न पाहू शकतात. आपल्या खेळाडूंना सर्वांगीण अनुभव देऊन त्यांना योग्य संधी आणि समर्थन प्रदान करण्याचे आमचे ध्येय आहे. महाराष्ट्र आयर्नमेन देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक चाहत्यांना आकर्षित करतील.” (Maharashtra Ironmen Launch Jersey for PHL)

 

या कार्यक्रमाला उपस्थित असलेले भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव यांनी सांगितले की, हँडबॉलशी त्यांचे विशेष नाते आहे आणि ते संपूर्ण हंगामात महाराष्ट्र आयर्नमनला सपोर्ट करतील.

 

“मी शाळेत हँडबॉल खेळलो आहे आणि या खेळाशी माझा विशेष नातं आहे. आपण सर्वांनी ऑलिम्पिकमध्ये हा खेळ पाहिला आहे आणि मला खात्री आहे की पुनित बालन आणि महाराष्ट्र आयर्नमनच्या दूरदृष्टीने आपण लवकरच त्या स्तरावर पोहोचू. मी महाराष्ट्राचा आहे, त्यामुळे महाराष्ट्र आयर्नमनबद्दलचे प्रेम स्वाभाविकपणे येते. सर्व खेळाडू आणि कर्मचारी यांना माझ्या शुभेच्छा आणि मला खात्री आहे की ते लीग जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील,” असे केदार जाधव म्हणाले.

 

 

 

महाराष्ट्र आयर्नमेनचे मुख्य प्रशिक्षक सुनील कुमार म्हणाले, “स्पर्धेसाठी आमची चांगली तयारी सुरू आहे.
प्रीमिअर हँडबॉल लीग ही दीर्घ स्पर्धा होणार असल्याने आम्ही खेळाडूंच्या फिटनेसवर भर देत आहोत.
आम्ही बरेच सामने खेळू आणि त्यानुसार आमची तयारी करत आहोत.”

प्रीमिअर हँडबॉल लीग जयपूर, राजस्थानमधील सवाई मानसिंग इनडोअर स्टेडियममध्ये ८ ते २५ जून २०२३ या कालावधीत खेळवली जाईल.
वायकॉम १८ नेटवर्क – स्पोर्ट्स १८-१ (HD आणि SD) आणि स्पोर्ट्स १८ खेल या वाहिन्यांवर थेट प्रसारित केली जाईल. Jio Cinema वरही ही लीग पाहता येणार आहे.

 

Web Title :  Maharashtra Ironmen Launch Jersey for PHL | Maharashtra Ironmen launch jersey for
Premier Handball League in a grand ceremony, Indian cricketer Kedar Jadhav also present at the event

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा