home page top 1

महाराष्ट्र एक नंबरवर की गुजरात; मोदींनी जनतेला जाहीर करावं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दि. १९ सप्टेंबर – गुजरात सर्वच क्षेत्रात एक नंबरवर आहे असे मोदी बोलत असतील आणि आज महाराष्ट्र एक नंबरवर असल्याचे फडणवीस बोलत असतील तर मोदींनी महाराष्ट्र की गुजरात एक नंबरवर आहे देशातील जनतेला जाहीर करावे असे थेट आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी मोदींना दिले आहे.

सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र एक नंबरला असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर केले आहे.त्याचा समाचार घेताना नवाब मलिक यांनी हे आव्हान दिले आहे.

याअगोदर नरेंद्र मोदी गुजरात हे देशात सर्वच क्षेत्रात एक नंबरवर आहे आणि आजही गुजरात एक नंबरवर आहे असे बोलत होते असेही नवाब मलिक म्हणाले.

Loading...
You might also like