कोल्हापूर – महाराष्ट्र वाद चिघळला दोन्ही राज्यांकडून एसटीची वाहतूक बंद

कोल्हापूर : बेळगावातील शिवसेना कार्यालयासमोर शुक्रवारी रुग्णवाहिकेची नेमप्लेटची तोडफोड करण्यात आली असून वाहनाला काळे फासण्याचा प्रकार झाला आहे़ तसेच मध्यरात्रीच्या सुमारास कोल्हापूर बसस्थानक परिसरात एस टी बसवर दगडफेकीचा प्रकार घडला होता़ शिवसेनेने कर्नाटकाच्या गाड्यांसमोर निदर्शने केली़ यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही राज्यातील एस टी बससेवा स्थगित करण्यात आली आहे.

बेळगावातील शिवसेना कार्यालयासमोर शुक्रवारी रुग्णवाहिकेची नंबरप्लेटची तोडफोड करुन वाहनाला काळे फासण्याचा प्रकार झाला. या प्रकाराने संतप्त झालेल्या शिवसेना कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांनी धर्मवरी संभाजी चौकात रास्ता रोको करीत या प्रकाराचा निषेध केला. भ्याड हल्ला करणार्‍या कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी पोलीस उपायुक्त विक्रम आमटे यांनी कारवाईचे आश्वासन दिले.

या घटनेची माहिती समजताच कोल्हापूरात शिवसेनेने कर्नाटकच्या बसगाड्यांसमोर निदर्शने केली होती. कोल्हापूर आणि बेळगाव तसेच सीमा भागातील अनेक शहरांमध्ये कोल्हापूरहून एस टी बसगाड्या सोडल्या जातात. तसेच मुंबई, पुण्यासह अनेक शहरातून कर्नाटकातील बंगळुरुसह अनेक शहरात बस वाहतूक केली जाते. कर्नाटकातून थेट मुंबई, पुण्यापर्यंत बससेवा देण्यात येते. आता दोन्ही राज्यांनी बस बंद केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.