Maharashtra Karnataka Border Issue | कोल्हापूर कर्नाटक धावणाऱ्या एसटीच्या 660 फेऱ्या रद्द

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Karnataka Border Issue | महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा तापला असताना आता कोल्हापूरवरून सुटणाऱ्या आणि कर्नाटकला जाणाऱ्या एसटी बससेवा बंद करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर बस स्थानकातून सुटणाऱ्या 660 गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी बेळगावात टोल नाक्यावर कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील ट्रकवर हल्ला केला होता. यावेळी 6 गाड्यांवर दगडफेकदेखील करण्यात आली होती. त्यामुळे एसटी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोल्हापूरवरून जाणाऱ्या 330 आणि येणाऱ्या 330 अशा 660 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. (Maharashtra Karnataka Border Issue)

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावांवर दावा केल्यानंतर सीमावादाला तोंड फुटले. यात मंगळवारी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक केली. विशेषत: माल वाहतुकीसह एसटी महामंडळाच्या बसेसवर दगडफेकीचा प्रकार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील कोगनोळी पोलीस ठाण्याच्या सूचनेनुसार मंगळवारी एसटीच्या कोल्हापूर विभागाने कर्नाटककडे जाणारी बससेवा बंद केली.

त्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या वतीने पुण्यात स्वारगेट स्थानकातदेखील कर्नाटकच्या गाड्यांवर काळे फासण्यात आले होते. त्यामुळे हे प्रकरण वाढत आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी एकनाथ शिंदे यांनी फोनवर चर्चा केली आहे.
त्यांनी दोनही बाजूंना शांतता प्रस्थापित करण्यावर बोलणे केले आहे.
पण, दुसरीकडे कर्नाटकात महाराष्ट्राच्या गाड्या फोडण्याचा आणि हल्ले करण्याचा प्रकार वाढल्याने सर्व लोक आणि शासन चिंताक्रांत आहे.

Web Title :- Maharashtra Karnataka Border Issue | 660 rounds of ST running Kolhapur Karnataka cancelled

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IND vs BAN 2nd ODI | भारतीय संघाला मोठा धक्का; रोहित शर्माला गंभीर दुखापत, रुग्णालयात दाखल

Supriya Sule | ‘हे अजिबात चालणार नाही’ ! संसदेत सुप्रिया सुळे आक्रमक

LPG Gas Cylinder Charges | डिलिव्हरी बॉय ‘गॅस टाकी घरपोच’चे अतिरिक्त पैसे घेतोय, तर ही पोस्ट नक्की वाचा