Maharashtra Karnataka Border Issue | महाराष्ट्राच्या 40 गावांवर कर्नाटक टाकणार दावा? विरोधकांच्या टीकेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Karnataka Border Issue | सांगली जिल्ह्यातील जत तालूक्यात पाण्याची भीषण टंचाई असते, हा परिसर दुष्काळातील परिसर म्हणून ओळखला जातो. त्यामुळे तेथील ४० गावांनी महाराष्ट्र सरकारकडून होणाऱ्या दुर्लक्षाचा निषेध म्हणून कर्नाटक राज्यात सामील होण्याचा ठराव संमत केला होता. त्याला आता अनेक वर्ष ओलांडली आहेत. कर्नाटक सरकारने मात्र ४० गावांचा विषय पुन्हा उकरून काढला आहे. महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर कर्नाटक (Maharashtra Karnataka Simavad) दावा सांगण्याचा गांभीर्याने विचार करत असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले आहे. (Maharashtra Karnataka Border Issue)

त्यांनतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी त्यांची प्रतिक्रया नोंदवली आहे. महाराष्ट्रातून एकही गाव कुठेही जाणार नाही. उलट सीमाभागातील गावे मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. तसेच म्हौसाळ योजना लगेच लागू करण्यात येणार आहे. कोरोनामुळे या योजनेला उशीर झाला, अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विधानामुळे महाराष्ट्रात विविध प्रतिक्रिया उमटत होत्या. विरोधक महाराष्ट्र सरकारवर टीका करत आहेत. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सदर प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

जतमधील सदर गावांचा ठराव हा २०१२ मधील होता. एवढ्यात त्यांनी कोणताही नवीन ठराव केलेला नाही.
सीमावाद शत्रुत्व नाही, तर कायदेशीर लढाई आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या राज्यपालांची कोल्हापूरमध्ये सीमाभागातील
प्रश्नाबाबत बैठक झाली. तसेच, राज्यसरकारकडून सीमाप्रश्नाबाबत चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई
यांची समन्वय समितीही तयार करण्यात आली होती. आता राज्य सरकार कर्नाटकला काय प्रत्युत्तर देते याची प्रतीक्षा आहे.

Web Title :- Maharashtra Karnataka Border Issue | deputy chief minister devendra fadnavis has reacted on the maharashtra karnataka border issue

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime | पूर्ववैमनस्यातून तरुणाचा कोयत्याने सपासप वार करुन खून, चाकणमधील शिवसेना भवन समोरील घटना

Rivaba Ravindra Jadeja | क्रिकेटर रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा यांच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल