Maharashtra-Karnataka Border Issue | महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर अमित शहांची पंचसूत्री, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिले ‘हे’ निर्देश (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra-Karnataka Border Issue | महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सध्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) असून त्या ठिकाणी निर्णय येईपर्यंत दोन्ही राज्यांनी कोणताही वाद घालू नये, कोणताही दावा करु नये असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांनी दिले आहेत. तसेच दोन्ही राज्यांतील प्रत्येकी तीन-तीन अशा एकूण सहा मंत्र्यांची एक समिती तयार करावी आणि सीमावादावर (Maharashtra-Karnataka Border Issue) चर्चा करावी असेही निर्देश त्यांनी दिले आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर आज दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत अमित शहा यांची बैठक झाली. त्यानंतर ते बोलत होते.

 

या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) महाराष्टाकडून तर कर्नाटकाकडून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (CM Basavaraj Bommai) आणि त्यांचे गृहमंत्री उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्राच्या बाजूने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी योग्य पद्धतीने बाजू मांडावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती. (Maharashtra-Karnataka Border Issue)

काय म्हणाले अमित शाह?
– दोन्ही राज्यांतील वाद मिटवण्यासाठी संविधानाच्या (Constitution) माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहे.

– हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे, त्यामुळे जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येत नाही तोपर्य़ंत दोन्ही राज्ये यावर कोणताही वाद घालणार नाहीत, दावा करणार नाहीत.

– राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री एकत्रित बसतील आणि यावर चर्चा करतील. त्यासाठी दोन्ही राज्यांच्या प्रत्येकी तीन अशा सहा मंत्र्यांची एक समिती तयार करण्यात येईल. लहानसहान वादग्रस्त मुद्यांवर ही समिती चर्चा करेल.

– दोन्ही राज्यातील व्यापारी, प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये,
सीमाभागात कायदा आणि सुव्यवस्था (Law and Order) राखली जावी यासाठी एका सिनियर आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल.

– दोन्ही राज्यांतील विरोधी पक्षांनी राजकीय मतदभेद बाजूला ठेवावा, राजकारणासाठी या मुद्याचा वापर करु नये.

– ट्विटरवरुन ज्यांनी या वादाला खतपाणी घातलंय, त्यांचा शोध घेण्यात येईल,
या प्रकरणातील फेक ट्विटर अकाउंटचा शोध घेऊन त्यावर कारवाई केली जाईल.

 

Web Title :- Maharashtra-Karnataka Border Issue |  maharashtra karnataka border dispute amit shaha meeting with maharashtra cm eknath shinde and karnataka basavaraj bommai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Vaidyanath Co Operative Bank | पंकजा मुंडे यांना धक्का; वैद्यनाथ सहकारी बँकेवर आरबीआयची कारवाई

Ajit Pawar | साहित्य क्षेत्रात राजकारण्यांनी ढवळाढवळ करू नये; ‘फ्रॅक्चर्ड फ्रिडम’ पुस्तकावरून अजित पवारांची प्रतिक्रिया

Pune PMC News | अग्निशमन सेवा शुल्क वाढीचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे