Maharashtra Karnataka Border Issue | कोल्हापूरमध्ये शिवसैनिकांनी काढली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची अंत्ययात्रा

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान बेळगाव आणि निपाणीसाठी आधीच सीमावाद (Maharashtra Karnataka Border Issue) न्यायालयात प्रलंबित आहे. असे असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याचा विषय काढून महाराष्ट्र आणि कर्नाटकात नवी भांडणं (Maharashtra Karnataka Border Issue) सुरु केली. त्यांनतर महाराष्ट्रात मोठे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. त्यांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन सुरु झाले असून, या आंदोलनाने पुढचा टप्पा गाठला आहे.

 

कोल्हापूरमध्ये शिवसैनिकांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा तीव्र निषेध करत त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. या अंतयात्रेत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. कोल्हापूर पोलिसांनी ही अंतयात्रा थांबवण्यासाठी तिरडी काढून घेण्याचा प्रयत्न केला असता, पोलिस आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार झटापट झाली.

 

ही अंत्ययात्रा कोल्हापुरातील दसरा चौक ते जयंती नाला मार्गावर काढण्यात येणार होती. पण, हे आंदोलन काही अंतरावर जाताच पोलिसांनी तिरडी काढून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवसैनिकांशी बोलताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले, ‘जत, अक्कलकोट व सोलापूरवर बोम्मई दावा करत कर्नाटकचा भाग (Maharashtra Karnataka Border Issue) असल्याचे सांगत आहेत. पण, जशा चोराच्या उलट्या बोंबा असतात तशाच बोम्मई यांच्या उलटड्या बोंबा आहेत. संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा सुरु असताना त्याला छेद देण्याचे काम बोम्मई करत आहेत. त्यात, कर्नाटक सरकारने त्यांच्याकडून येणाऱ्या बसेस बंद केल्या आहेत, ही जखमेवर मीठ चोळण्यासारखी गोष्ट आहे.’

गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या वादानंतर कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील त्यांची बससेवा बंद केल्याचे वृत्त आहे.
यामुळे आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी आज कोल्हापुरात सीबीएस स्थानकातील कर्नाटकच्या बस गाड्यांवर ‘जय महाराष्ट्र’ लिहित त्यांची पाठवणी केली.
तसेच, महाराष्ट्र परिवहन मंडळाने कर्नाटकाच्या बस महाराष्ट्रात येऊन देऊ नयेत, असे आवाहन केले.

 

Web Title :- Maharashtra Karnataka Border Issue | symbolic funeral procession of karnataka chief minister by shiv sainiks in kolhapur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | मारणे गँगची भिती दाखवून बिल्डरकडे खंडणीची मागणी, सराईत गुन्हेगार राकेश मारणेवर FIR

Jitendra Awhad On Ramdev Baba | ‘रामदेव बाबांच्या मनात आणि नजरेत विकृती भरलीय’ – जितेंद्र आव्हाड

Washim ACB Trap | शिवभोजन थाळीची थकीत रक्कम मिळण्यासाठी मागितली लाच; पुरवठा विभागाचा निरीक्षण अधिकारी एसीबीच्या ताब्यात