महाराष्ट्र केसरी 2020 ! गतविजेता ‘बाला’ आणि ‘अभिजीत’ स्पर्धेच्या बाहेर, दिग्गजांना दाखवलं ‘आस्मान’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात माती विभागाच्या उपांत्य फेरीत सोलापूरच्या माऊली जमदाडेनं धक्कादायक निकालाची नोंद केली आहे. माऊलीने गतविजेता बाला रफिक शेखला चितपट करून माती विभागाची अंतिम फेरी गाठली आहे. तर गतउपविजेता आणि 2018 च्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता अभिजीत कटकेचे देखील महाराष्ट्र केसरीमधील आव्हान संपुष्टात आले आहे.

बाला रफिक शेख आणि माऊली जमदाडे यांच्यात झालेल्या लढतीमध्ये शेखने पहिल्या मिनिटाला 2-0 अशी आघाडीवर होता पण दुसऱ्याच मिनिटाला माऊलीने हप्ते डावावर बाला रफिकला चितपट करत यंदाच्या स्पर्धेतला धक्कादायक निकाल नोंदवला. बालाला चितपट करणारा माऊली हा मूळचा सोलापूरचा असून तो कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत सराव करतो.

मॅट विभागातील कुस्तीमध्ये अभिजीतला नाशिकच्या हर्षवर्धन सदगीकरकडून धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला आहे. सगल चौथ्यांदा महाराष्ट्र केसरी किताबासाठी लढण्याच्या मनसुब्याने मॅटवर उतरलेल्या अभिजितला हर्षवर्धनं 5-2 अशा फरकाने हरवून सनसनाटी विजय नोंदवला. हर्षवर्धन हा या स्पर्धेत नाशिककडून खेळतो आहे. पण तो अर्जुनवीर काका पवारांचा चेला असून पुण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात सराव करतो. या दोन धक्कादायक निकालामुळे यांदाच्या महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात नवा पैलवान मानाची चांदीची गदा उंचावणार हे निश्चित झाले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/