Maharashtra Kesari | कोल्हापुरचा मल्ल पृथ्वीराज पाटील यंदाचा महाराष्ट्र केसरी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Maharashtra Kesari | महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील (Prithviraj Patil) याने बाजी मारली आहे. महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विरूद्ध मुंबई पूर्वचा मल्ल विशाल बनकर (Vishal Bankar) यांच्यात लढत झाली. चुरशीच्या लढतीत अखेर पृथ्वीराज पाटीलने बाजी मारत विशाल बनकरला पराभूत केलं आहे.

 

राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने सातारा जिल्हा तालीम संघ (Satara District Talim Association) आयोजित 64 वी राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धा साताऱ्यातील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडली. यामध्ये पृथ्वीराज पाटील यंदाचा महाराष्ट्र केसरी झाल्याने कोल्हापुरात उत्साहाचे वातावरण आहे. कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीतील (Motibagh Talim Kolhapur) मल्ल पृथ्वीराज पाटीलने अटीतटीच्या लढतीत पिछाडीवर असताना अखेरच्या 45 सेकंदात सामन्याला कलाटणी दिली आहे. त्याने 5-4 अशा फरकाने सामना जिंकत महाराष्ट्र केसरीवर आपलं नाव कोरलं आहे. (Maharashtra Kesari)

 

पहिल्या फेरीत विशाल बनकरने 4-0 अशी आघाडी घेतली होती. माती व गादी गटाच्या अंतिम सामने रंगतदार झाले. त्यामध्ये गादी गटातून पृथ्वीराज पाटील तर माती गटातून विशाल बनकर महाराष्ट्र केसरीचे दावेदार ठरले आहेत. पृथ्वीराज व विशाल यांच्यात उत्कंठावर्धक सामन्यात पृथ्वीराजने बाजी मारली आहे.

 

Web Title :- Maharashtra Kesari | prithviraj patil win maharashtra kesari title against vishal bankar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा