‘या’ कारणामुळं नारायण राणेंचा भाजप प्रवेश ‘लटकला’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे आपल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे विलीनीकरण करून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र राणेंना स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचा जोरदार विरोध आहे. तसेच भाजप सोबत असलेली शिवसेना कायमस्वरूपी राणेंच्या विरोधात राहिली आहे त्यामुळे आजवर राणे भाजपमध्ये प्रवेश करू शकलेले नाहीत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप रविवारी सोलापूर येथे होणार आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित असणार आहे. त्यामुळे यावेळी विरोधी पक्षात असलेल्या अनेक आजी माजी बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश होणार आहे. याचवेळी नारायण राणे यांचाही प्रवेश होईल अशी अपेक्षा होती मात्र मुख्यमंत्र्यांनी यावर एका हिंदी चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हंटले आहे की राणेंबाबतचा निर्णय शिवसेनेशी बोलूनच घेतला जाईल. त्यामुळे राणे यांचा पक्ष विलीनीकरण करून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय अद्याप तरी लटकलेला दिसतोय.

म्हणून शिवसेनेचा राणेंच्या प्रवेशाला विरोध –

राणे हे मुळात शिवसेनेतील बंडखोर व्यक्तिमत्व. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पासून नारायण राणे यांचे वाद संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेले आहेत. तसेच गेल्या विधानसभेत शिवसेनेने नारायण राणेंच्या कोकणातील बालेकिल्याला भगदाड पाडत कुडाळ-मालवण हा विधानसभा मतदारसंघ काबीज केला होता. त्यामुळे आता पुन्हा भाजपात राणेंचा प्रवेश म्हणजे ती शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरू शकते म्हणून सेनेचा राणेंच्या भाजप प्रवेशाला विरोध असू शकतो.

मतदार संघांचा गोंधळ –

नारायण राणे भाजपकडे जे मतदारसंघ मागतील ते मतदारसंघ सध्या शिवसेनेकडे आहेत त्यामुळे भाजप सुद्धा राणेंना तेथून तिकीट देऊ शकेल कि नाही याबाबत शंका आहे त्यामुळेच नारायण राणेंचा पक्ष प्रवेश रखडला गेला असल्याची चर्चा आहे.

आरोग्यविषयक वृत्त –