Maharashtra Legislative Council Election-2022 | महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक जाहीर; ‘या’ दिवशी होणार मतदान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Legislative Council Election-2022 | एकीकडे राज्यसभा निवडणुकांचे (Rajya Sabha Election) बिगुल वाजले असतानाच आता महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक (Maharashtra Legislative Council Election-2022) जाहीर करण्यात आली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने (Maharashtra State Election Commission) दिली. आयोगाच्या माहितीनुसार, 2 जून रोजी विधान परिषद निवडणूक प्रक्रिया सुरु होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यानुसार 9 जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असेल. तसेच 10 जागांसाठी 20 जून रोजी मतदान होणार आहे.

विधान परिषदेच्या रिक्त होत असलेल्या 10 जागांपैकी 5 जागा भाजपाच्या (BJP) आहेत. दरम्यान, सध्याच्या संख्याबळानुसार भाजपाला 4 जागा निवडून आणता येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर शिवसेना (Shivsena) दोन, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) दोन जागा आणि काँग्रेसची (Congress) 1 जागा निवडून येऊ शकते. काँग्रेसला आणखी एका जागेसाठी म्हणजेच 10 व्या जागेसाठी जादा मतांची आवश्यकता आहे. या अनुषंगाने या जागेसाठी भाजपा आणि काँग्रेसमध्ये चांगलीच लढत होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Legislative Council Election-2022)

या दरम्यान, शिवसेनेचे नेते सुभाष देसाई (Subhash Desai), भाजपचे नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar), रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar), सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) अशा दिग्गज नेत्यांची विधान परिषदेतील मुदत संपत आहे. त्यामुळे आता विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख पक्षांनी आपली मोट बांधण्यास सुरूवात केली आहे. विधान परिषदेच्या 20 जून रोजी निवडणुका होणार असल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच वादळी होणार असण्याची शक्यता आहे.

Web Title : Maharashtra Legislative Council Election-2022 | maharashtra polls to 10 legislative council seats on june 20 election 2022

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त