Maharashtra Legislative Council Elections | महाराष्ट्र विधान परिषदेसाठी कोल्हापूर, ‘धुळे-नंदुरबार’, नागपूर, मुंबई आणि ‘अकोला-बुलढाणा-वाशीम’ येथून ‘या’ 5 दिग्गजांना भाजपकडून उमेदवारी; चित्रा वाघ यांना संधी नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Legislative Council Elections | राज्यातील विधान परिषदेच्या 5 जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने कोल्हापूर, धुळे आणि नंदूरबार, नागपूर, अकोला-बुलढाणा-वाशिम आणि मुंबई या पाच जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांना संधी देण्यात आली आहे. तसेच अमल महाडिक (amal mahadik), अमरीश पटेल (amrish patel) , वसंत खंडेलवाल (Vasant Khandelwal) आणि राजसंस सिंह (Rajsans Singh) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, भाजपने आज जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये चित्रा वाघ (chitra wagh) यांना वगळण्यात आले आहे. (Maharashtra Legislative Council Elections)

 

 

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेले 6 सदस्यांसाठी निवडणूक (Maharashtra Legislative Council Elections) होत आहे. कदम रामदास गंगाराम Kadam Ramdas Gangaram (मुंबई मतदारसंघ), अशोक अर्जुनराव उर्फ भाई जगताप Bhai Jagtap (मुंबई), पाटील सतेज उर्फ बंटी Patil Satej alias Bunty (कोल्हापूर), अमरीश रसिकलाल पटेल Amrishbhai Rasiklal Patel (धुळे – नंदूरबार), गोपीकिसन राधाकिसन बाजोरिया Gopikisan Radhakisan Bajoria (अकोला – बुलढाणा – वाशिम) आणि व्यास गिरीषचंद्र बच्छराज Vyas Girishchandra Bachcharaj (नागपूर मतदारसंघ) यांची 1 जानेवारी 2022 रोजी मुदत समाप्त होत आहे.

 

विधान परिषदेसाठी भाजप उमेदवारांची यादी

कोल्हापूर – अमल महाडिक
धुळे-नंदुरबार – अमरीश पटेल
नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
अकोला-बुलडाणा-वाशिम – वसंत खंडेलवाल
मुंबई – राजहंस सिंह

 

Web Title :- Maharashtra Legislative Council Elections | BJP Maharashtra Legislative Council from Kolhapur, Dhule-Nandurbar, Nagpur, Mumbai and Akola-Buldhana-Washim; Chitra Wagh has no chance

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा