Coronavirus Impact : मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंकडून महाराष्ट्र ‘लॉकडाऊन’ची घोषणा ! आज मध्यरात्रीपासून राज्यात कलम 144 लागू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोराना व्हायरसचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यास रोखण्यासाठी तसेच सर्व नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात आज (रविवारी) जनता कर्फ्यूचं आवाहन केलं होते.

यापुर्वीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर शहर हे 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचं सांगितलं होते. आज देखील कोरोनाच्या रूग्णांमध्ये महाराष्ट्रात वाढ झाली आहे. त्याचपार्श्वभुमीवर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र लॉकडाऊनची घोषणा केली आहे म्हणजेच आज मध्यरात्रीपासून राज्यात कलम 144 लागू करण्याची घोषणा केली आहे.