Maharashtra Local Body Election | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर, तीन आठवड्यांनी सुनावणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Local Body Election | राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबवणीवर पडल्या आहेत. या निवडणूकीसंदर्भातील (Maharashtra Local Body Election) सुनावणी तीन आठवड्यांनी लांबणीवर गेली आहे. आता या प्रकरणाची सुनावीणी पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. बुधवारी सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) कामकाजात हे प्रकरण लिस्ट करण्यात आले होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतील हे प्रकरण बुधवारी मेन्शन केले होते. त्यानंतर सरन्यायाधीशांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी करण्यास सांगितले. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुका कधी होणार हे या सुनावणीवर अवलंबून आहे. राज्यातील 92 नगरपरिषदांमध्ये ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) मुद्दाही याच याचिकेत समाविष्ट आहे. मागील अनेक दिवसांपासून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे.
या प्रकरणावरील शेवटचा निर्णय सुप्रीम कोर्टानं यापूर्वी 28 जुलै 2022 रोजी दिला होता.
या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाला परवानगी दिली होती.
मात्र, त्यानंतर 92 नगपरिषदांचा प्रश्न कोर्टात प्रलंबित होता.
त्यानंतर राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नवीन सरकार स्थापन झाले.
नव्या सरकारने 4 ऑगस्ट 2022 रोजी निवडणुका आणि प्रभाग रचना याबाबत नवीन अध्यादेश काढला.
यानंतर हा मुद्दा सुप्रीम कोर्टात पोहोचला.
Web Title :- Maharashtra Local Body Election | postponement of local self government elections the hearing will be held in three weeks
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Chandrashekhar Bawankule | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा ‘मविआ’ला टोला