Maharashtra Lockdown Again | महाराष्ट्रात पुन्हा लागणार का लॉकडाऊन?, आरोग्य मंत्र्यांनी केले मोठे वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Lockdown Again | कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनने (Omicron) संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. देशात सुद्धा ओमिक्रॉन वेगाने हातपाय पसरत आहे. ओमिक्रॉनची प्रकरणे सर्वात जास्त महाराष्ट्र (Maharashtra) आणि दिल्लीत (Delhi) समोर आली आहेत. (Maharashtra Lockdown Again)

कोरोना व्हायरसच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत सर्वात जास्त प्रभावित महाराष्ट्रात ओमिक्रॉन वेगाने पसरत आहे. अशावेळी राज्याचे सीएम उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी गुरुवारी टास्क फोर्ससोबत मिटिंग केली. ज्यामध्ये राज्यातील स्थितीवर चर्चा करण्यात आली. (Maharashtra Lockdown Again)

या दरम्यान राज्याच्या आरोग्य मंत्र्यांना विचारण्यात आले की, महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? यावर त्यांनी म्हटले की, लॉकडाऊन लावण्याचा निर्णय राज्याचे सीएम उद्धव ठाकरे घेतील. मात्र त्यांनी हे संकेत आवश्य दिले की, सरकार सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही चूक सहन करणार नाही.

आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी म्हटले की, कोरोनाची प्रकरणे ज्याप्रकारे वेगाने वाढत आहे, ते निश्चितच चिंताजनक आहे. याबाबत राज्याचे सीएम लवकरच निर्णय घेऊ शकतात. टोपे यांनी म्हटले की, पॉझिटिव्ह रेटमध्ये सुद्धा खुप वाढ झाली आहे. राज्यात कोविडच्या 4000 पेक्षा जास्त नवीन केस समोर आल्याने चिंता वाढली आहे. सध्या पॉझिटिव्हिटी रेट 8.48 च्या जवळपास आहे.

राजेश टोपे यांनी म्हटले की, मी सर्वांना आवाहन करतो की, लोकांना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि संसर्गापासून वाचण्यासाठी कोविड गाईडलाईन्सचे पालन करावे. त्यांनी म्हटले की, सध्या राज्यात शाळा बंद होणार नाहीत.

मुलांना व्हॅक्सीनेशन सेंटरवर (Vaccination Center) नेऊन व्हॅक्सीनेशन करावे लागेल. आम्ही शाळा, कॉलेजच्या मुलांचे व्हॅक्सीनेशन करू. इतर आजारात डॉक्टरांकडे जाऊन व्हॅक्सीन घ्यावी लागते, तशीच व्यवस्था केली जाईल.

मुंबईत कोरोना व्हायरसची (Coronavirus in Mumbai) 3,671 नवीन प्रकरणे समोर आली आहेत.
एका दिवसात 371 रूग्ण बरे झाले आहेत आणि या दरम्यान कोरोनामुळे कुणाचाही मृत्यू झालेला नाही.
शहरात एकुण कोविडची प्रकरणे वाढून 7,79,479 वर पोहचली आहेत.
आतापर्यंत एकुण 7,49,159 रूग्ण बरे झाले आहेत आणि आतापर्यंत एकुण 16,375 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत अ‍ॅक्टिव्ह प्रकरणांची संख्या 11,360 आहे.

Web Title : Maharashtra Lockdown Again | maharashtra lockdown again health minister rajesh tope
big statement regarding restrictions amid rising covid cases

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्यात नागरिकांना त्रास देणार्‍या गुंडाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला ! येरवडा पोलिसांचा स्वरक्षणार्थ हवेत गोळीबार

Government Scheme | ‘ही’ सरकारी योजना माजी सैनिकांच्या मुलींच्या लग्नासाठी देते 50,000 ची रक्कम; जाणून घ्या कसा मिळेल लाभ

Employees Pension Scheme | 300% पर्यंत वाढू शकते पेन्शन ! 7500 रुपयांवरून वाढून 25000 रुपये होईल पेन्शन, जाणून घ्या गणित

Multibagger Penny stock | 15 महिन्यात 1 लाखाचे झाले 68 लाख, टाटा ग्रुपची आहे कंपनी

Gram Ujala Scheme | 12 वॅट LED बल्ब अवघ्या 10 रुपयात! जाणून घ्या पूर्ण योजना आणि लाभ घेण्याची शेवटची तारीख