Maharashtra Lockdown | CM उद्धव ठाकरेंचं मोठं विधान; म्हणाले – ‘…तर संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लावावा लागेल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Lockdown | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यात कोरोनाची तिसरी लाट (Coronavirus) आली तर पूर्ण राज्यात लॉकडाऊन लावावा लागेल, असं सांगितलं आहे. मुंबईतील सांताक्रूझ येथे आज (शनिवारी) खाल बाल कोविड काळजी केंद्राचं उदघाटन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. राज्यात कोरोना रुग्णांसाठी 700 मेट्रीक टन ऑक्सिजन (700 metric tons of oxygen) लागेल त्या दिवशी पूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) करावा लागेल, असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले की, ‘जनतेच्या सेवेसाठी आज 2आरोग्यसेवेचं लोकार्पण करण्यात आलं. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आलीय. देशात अन्य राज्यात लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग वाढत असल्याचं दिसून येतंय. आपल्याकडे याचा धोका वाढणार नाही याची आपण काळजी घेतच आहोत. त्याच पार्श्वभूमीवर लहान मुलांना कोरोनाची (Corona) लागण झाली तर त्यांना रुग्णालयाच्या भयावह वातावरणाला सामोरं जावे लागू नये यासाठी अशी विशेष काळजी केंद्र उभारली जात आहेत.

पुढे मुख्यमंत्री म्हणाले, ‘मी आता सुद्धा गर्दी बघतो आहे. पण ही गर्दी योग्य नाहीय. आपण सर्व काळजी घेत अर्थचक्र सुरू राहावं म्हणून निर्बंध शिथिल केले आहेत. कोणतेही राजकीय स्वार्थ साधण्यासाठी नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचेल असं काही करू नका. अशी विनंती देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. पुढे ते म्हणाले, नागरिकांचा जीव धोक्यात येईल असं काही करणं टाळलं पाहिजे. असं आवाहन त्यांनी सर्व राजकीय पक्षांना, धार्मिक आणि सामाजिक संघटनांना केलं आहे.

या दरम्यान, कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही.
आपण जर नियम पाळले नाहीत तर कदाचित तिसरी लाट अपेक्षेपेक्षा लवकर येईल.
यामुळे लॉकडाऊन टाळायचा असेल तर कुणीही कितीही चिथावण्याचं काम केलं तर चिथावणीला दाद देऊ नका,
असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी म्हटलं आहे.

Web Title : Maharashtra Lockdown | cm uddhav thackeray warns about lockdown covid care center opning mumbai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Mumbai Crime Branch Police | दोन तासाचे 2 लाख रुपये;
मुंबईतील अभिनेत्री आणि टॉप मॉडेलच्या सेक्स रॅकेटबाबत धक्कादायक खुलासा

Mumbai Crime Branch Police | दोन तासाचे 2 लाख रुपये; मुंबईतील अभिनेत्री आणि टॉप मॉडेलच्या सेक्स रॅकेटबाबत धक्कादायक खुलासा

Maharashtra Police | महिला पोलिसाची बदनामी करणारा निघाला पोलिस कर्मचारी; पोलीस दलात खळबळ