Maharashtra News : RTI मध्ये धक्कादायक खुलासा ! 2020 लॉकडाऊनमध्ये झाला 12,789 नवजात बालकांचा मृत्यू

नवी दिल्ली : माहिती अधिकारांतर्गत (आरटीआय) एक महत्वाची माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार, फेब्रुवारी 2020 आणि डिसेंबर 2020 च्या दरम्यान महाराष्ट्रात एकुण 12,179 नवजात बालकांचा मृत्यू झाला. ही मुले 0 ते 1 वर्षाच्या आतील होती. जिल्हानिहाय आकडेवारीनुसार समजते की, मुंबई, अकोला, औरंगाबाद, नाशिक, नागपुर आणि पुण्यात 4,411 बालमुत्यू दर आहे. जो एकुण मृत्यूंच्या 36.22% आहे.

या कालावधी दरम्यान, मुंबईत सर्वात जास्त 1,097 मृत्यू झाले, यानंतर अकोला 783, औरंगाबाद 729, नाशिक 664, नागपुर 587, आणि पुणे 551, या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त मृत्यू झाले. सिंधुदुर्ग 46, लातूर 78, आणि वाशिम 89 हे तीन जिल्हे आहेत जिथे सर्वात कमी बालमृत्यू नोंदले गेले आहेत.

मुंबईसारख्या शहरात कुपोषणावर काम करण्याची आवश्यकता
हे आरटीआय एका एनजीओकडून दाखल करण्यात आले होते. जी मानवी हक्क आणि कुपोषणाच्या क्षेत्रात काम करत आहे. एनजीओचे समन्वयक रूपेश किर यांनी सांगितले की, आम्हाला जी माहिती मिळाला ती धक्कादायक आहे. महाराष्ट्रात 2020 मध्ये 12,179 नवजात बालकांचा मृत्यू झाला.

तर 1 ते 5 वर्षाच्या बालकांच्या मृत्यूची संख्या 1,872 आहे. मागील वर्षी फेब्रुवारीपासून डिसेंबरपर्यंत देशात लॉकडाऊन होते. त्यांनी सांगितले की, राज्यातील ग्रामीण आणि जनजातीय बेल्टमध्ये कुपोषणाची समस्या उघड करायची होती, परंतु या आकड्यांनी मुंबईसारख्या शहरात काम करण्याच्या आवश्यकतेकडे इशारा केला आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पाठवले पत्र
एनजीओने महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना एक पत्र पाठवले आहे, ज्यामध्ये आरटीआय अंतर्गत प्राप्त आकड्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. पत्रात बालमृत्युच्या विविध कारणांचा संदर्भ देण्यात आला होता, ज्यामध्ये वेळेपूर्वी जन्म, माता आणि बाळाचे कुपोषण, संसर्ग, निमोनिया आणि श्वास घेण्याची समस्या यांचा समावेश होता.

पत्रात म्हटले आहे की, शहरीकरणाच्या क्षेत्रात मृत्यूंची जास्त संख्या एक चिंतेंचा विषय आहे आणि यास तोंड देण्यासाठी पावले उचलण्याची आवश्यकता आहे.