Maharashtra Lockdown | राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार?; राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Lockdown | महाराष्ट्रात सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट झाली आहे. या पार्श्वभुमीवर राज्य सरकारने (State Government) निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र असे असले तरी कोरोनाच्या तिस-या लाटेचा (Coronavirus third wave) अंदाज देखील व्यक्त केला आहे. तसेच यंदा गणेश उत्सव सणाच्या पार्श्वभुमीवर बाधितांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत असल्याने राज्यात पुन्हा निर्बंध लागणार असल्याची चर्चा आहे. यावरुन आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी लाॅकडाऊन (Maharashtra Lockdown) बाबत महत्वाची माहिती दिली आहे.

राजेश टाेपे (Rajesh Tope) यांनी म्हटलं आहे की, सध्या लॉकडाऊनचा कुठलाच विषय नाहीये. मात्र,
ज्यादिवशी 7 हजार मेट्रिक टन (7 thousand metric tons) ऑक्सिजनची गरज पडेल त्यादिवशी
लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लावावे लागतील, असं सुचनामध्ये आधीच स्पष्ट केल्याचं राजेश टाेपे यांनी सांगितलं आहे.

Earn Money | अवघ्या 5 हजार रुपयात सुरू करा ‘हा’ बिझनेस, दरमहिना होईल लाखो रूपयांची कमाई !

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट होत असली तरी धोका अजुनही टळलेली नाही. अद्याप काही भागात
बाधितांची संख्या दिसुन येत आहे. या पार्श्वभुमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिलेल्या या माहितीमुळे असं स्पष्ट होत आहे की, ऎन सणासुदीच्या या काळात राज्यात तुर्त तरी कोणतेही कठोर निर्बंध अथवा लॉकडाऊन लावण्यात येणार नाही. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता विषाणूचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवली आहे.

राज्यात कोरोना (Corona) बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरी धोका अद्याप टळलेला नाहीये. अनेक भागांत अद्यापही रुग्णसंख्या कायम असल्याचं दिसत आहे आणि त्यातच कोरोनाच्या संभाव्य तिसरी लाट (Coronavirus third wave) येण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या महिन्यात गौरी-गणपती आहेत आणि सणासुदीच्या काळात कोविड रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत असल्याने पुन्हा कठोर निर्बंध (Restrictions) किंवा लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, सध्या लॉकडाऊनचा कुठलाच विषय नाहीये. मात्र ज्यादिवशी 7 हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज पडेल त्यादिवशी लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लावावे लागतील, असं नोटिफिकेशनमध्ये आम्ही अगोदरच स्पष्ट केलं आहे.

हे देखील वाचा

Pune Crime | खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्याकडून गोळीबार, घरामध्ये केला चोरीचा प्रयत्न

Covid-19 | जगातील सर्वात विषारी साप वाचवणार मनुष्याचा जीव, कोरोना व्हायरसविरूद्ध ’रामबाण’ ठरले विष

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Maharashtra Lockdown | maharashtra health minister rajesh tope said there is no decision to impose lockdown in state

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update