Maharashtra Lockdown | ‘राज्यात 800 मेट्रिक टन ऑक्सिजन लागल्यास Lockdown – राजेश टोपे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Lockdown | महाराष्ट्रात राज्य सरकारने (Maharashtra Government) काल (शुक्रवारी) काही निर्बंध लावले आहेत. रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महत्वपुर्ण माहिती दिली आहे. ‘महाराष्ट्रात तिसरी लाट आली तर ती ओमायक्रॉनची (Omicron Covid Variant) असेल,’ अशी प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली. तसेच, राज्यातील लॉकडाऊनबाबतही (Maharashtra Lockdown) महत्वपुर्ण माहिती टोपे यांनी दिली आहे.

 

राजेश टोपे म्हणाले, ‘राज्यात तिसरी लाट आली तर ती ओमायक्रॉनची असेल. जर ओमायक्रॉनची गती आणखी वाढत गेली ऑक्सिजनच्या अनुषंगाने आपण लॉकडाऊनबाबत (Maharashtra Lockdown) विचार करत आहोत. ज्या दिवशी 800 मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवशी लॉकडाऊन लावावा लागणार. पण कदाचित संसर्गाची गती इतकी असेल तर 800 मेट्रिक टन ऑक्सिजनची (Oxygen) आवश्यकता कदाचित 500 वर आणावी लागेल अशी परिस्थिती देखील येऊ शकते.

दरम्यान, ‘ओमायक्रोनचे रुग्ण वाढत असल्यानं चिंता वाढली आहे. त्यामूळेच निर्बंध (Restrictions) लागू केले असल्याचे राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी म्हटलं आहे.
दरम्यान कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव यामुळे गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्यात काही नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
त्यानुसार रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
याबाबत कालच (शुक्रवारी) राज्य सरकारने नियमावली जारी केली आहे.

 

Web Title :- Maharashtra Lockdown | omicron lockdown if the state needs 800 metric tons of oxygen health minister rajesh tope

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kirit Somaiya | ‘अनिल परब यांची आमदारकी आणि मंत्रीपद रद्द करण्यासाठी राज्यपाल आणि निवडणूक आयोगाकडे जाणार’

Pune Crime | बेकायदेशीर खासगी सावकारी करणाऱ्या आशिष पाटणे याच्यावर गुन्हे शाखा युनिट 5 कडून कारवाई

बिहारमध्ये उंदरांचा नवीन ’कारनामा’, दारू आणि धरणानंतर आता X-Ray मशीनला केले टार्गेट, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण

Pune Corona | पुणे शहरात सलग दुसऱ्या दिवशी रुग्णांची संख्या शंभरच्यावर, गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 149 नवीन रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

Omicron Covid Variant | नववर्षाच्या स्वागत कार्यक्रमांवर ओमिक्रॉन व्हेरियंटचे सावट ! मुंबई महापालिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय