Homeताज्या बातम्यापुण्यात भाजपकडून जमावबंदीच्या आदेशाला हरताळ !

पुण्यात भाजपकडून जमावबंदीच्या आदेशाला हरताळ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात आजपासून मिनी लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी भाजप शहर कार्यालयात पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त भाजप नेत्यांनी जमावबंदीच्या नियमाला हरताळ फासल्याचे दिसून आले. अर्थातच कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने करत असल्याचे सांगायलाही नेतेमंडळी यावेळी विसरले नाहीत. दरम्यान सरकारने फसवणूक केली असून विकेंड लॅाकडाउनची चर्चा करुन पूर्ण लॅाकडाउन लावल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

पुण्यात भाजपच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मंगळवारी (दि. 6) भाजप प्रदेशाध्यक्षांसह जवळपास 15 नेते आणि कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. पुण्यात आजपासून नियमानुसार शहरात सकाळी 7 ते संध्याकाळी 6 दरम्यान शहरात 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र यायला परवानगी नाही. असे असताना भाजप नेते आणि कार्यकर्ते एकत्र आले. या कार्यक्रमाला सध्याची परिस्थिती लक्षात घेता थोड्याच लोकांना बोलावल्याचे पाटील यांनी सांगितले. कोरोनाच्या परिस्थितीबाबत सांगत शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले की, आज व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन केले आहे. आपण त्या निमित्ताने लसीकरणासाठी मोहीम सुरु करत आहोत. पण राज्य सरकार मोगलाई लादण्याचा प्रयत्न करत आहे. पीएमपीएमएल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय आम्हाला मान्य नाही. त्यामुळे त्याला विरोध करणार असल्याचे ते म्हणाले.

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News