भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी मांडली भूमिका, म्हणाले – ‘आमदारांचा निधी 2 कोटीने कमी करा अन् कामगारांना द्या’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कडक निर्बंध लागू करूनही कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे राज्यात क़डक लॉकडाऊन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत रोखठोक भूमिका घेत लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे म्हटले आहे. याच दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील आमदारांचा विकासनिधी 2 कोटी रुपयांनी कमी करा आणि कामगारांना 5 हजार रुपये द्या अशी भूमिका पाटील यांनी मांडली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलताना आपल मत मांडले आहे. बैठकीला अजित पवार, अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, एकनाथ शिंदे, विजय वडेट्टीवार, सीताराम कुंटे उपस्थित आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे महत्त्वाचे, लॉकडाऊनबद्दलचा मधला मार्ग काढावा, मध्यबिंदू काढला पाहिजे, लॉकडाऊनबद्द्ल माध्यमांना फक्त 2 ते 3 लोकांनी माहिती द्यावी. जास्त लोक बोलत राहिले तर लोकामध्ये संभ्रम निर्माण होते, असा मुद्दा अशोक चव्हाण यांननी मांडला आहे. तर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्याला मदत व्हावी म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा, किमान मी तरी कोरोनाबद्दल राजकारण करत नाही, असे म्हटले. यावर फडणवीस यांनी आम्ही राजकारण बंद करतो पण तुमच्या मंत्र्यांना आणि सहकाऱ्यांनाही समज द्या, सहकार्य आम्ही करू पण त्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या, अशी अट मुख्यमंत्र्यासमोर ठेवली आहे.