Maharashtra Lockdown : नागरिकांकडून कडक निर्बंधाच्या नियमांची पायमल्ली, निर्बंध आणखी कडक होणार, जे सुरु आहे ते होईल बंद ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाचे संक्रमण वेगाने पसरत आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याचा परिणाम आरोग्य यंत्रणेवर पडत आहे. राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. कोरोनाची साखळ तोडण्यासाठी राज्य सरकारने 15 दिवसांचा लॉकडाऊन लागू केला आहे. परंतु अद्यापही लोकांकाडून लॉकडाऊनच्या नियमांचे पालन होत नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचे निर्बंध आणखी कडक करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यात लॉकडाऊन 2.0 लागू केला आहे. मात्र, लोकांनी थट्टा मस्करी करत लॉकडाऊनच्या नियमांना पडदुळी तुडवल्याचे पहायला मिळत आहे. लॉकडाऊन असताना देखील लोक विनाकारण फिरताना दिसत आहे. नियमांचे उल्लंघन करत आहेत. यामुळे राज्यात लॉकडाऊनचे नियम आणखी कडक करण्यात येणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी लोकं नियमांचे उल्लंघन करुन गर्दी करत असल्याचे पहायला मिळत आहे.

त्यामुळे आता जीवनावश्यक गोष्टीवर निर्बंध येण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. कोविड-19 संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकार आणखी कडक पाऊल उचलण्यात तयारीत आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये ज्या अटी शिथिल करण्यात आल्या होत्या. त्या बंद करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी अनेक लघु उद्योग, स्टार्ट अप्स, व्यवसाय यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांत बँकांकडून कर्जे घेतली आहेत. सध्याच्या परिस्थितीत त्यांची ओढाताण होत आहे. निर्बंधामुळे त्यांच्यावर आर्थिक ताण देखील पडत आहे. हे पाहता चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत त्यांच्याकडून हप्ते स्वीकारण्यात येऊ नयेत अशा सूचना बँकांना द्याव्यात, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच कोविड संसर्ग हा राज्य आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करावे असेही म्हटले आहे.