Maharashtra Lockdown | …तर महाराष्ट्रात लॉकडाऊन निश्चित?; सध्या दैनंदिन बाधितांची संख्या 4 ते 5 हजार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Maharashtra Lockdown | राज्यात मागील काही महिन्यापासुन कोरोनाच्या प्रमाणात घट होत असल्याने राज्य सरकारने निर्बंंघात शिथिल केली. मात्र, सध्या कोरोनाची परिस्थिती वाढताना दिसत आहे. दैनदिन बाधितांची सख्या साडेचार ते 5 हजार आहे. दैनंदिन वीस हजार कोरोना बाधित पॉझिटिव्ह (Positive) निघू लागतील त्या दिवशी संपूर्ण राज्यात लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) करावा लागेल. नाहीतर, परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी (Senior officer) राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना दिली.

अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, दैनंदिन तीस हजार रुग्ण पॉझिटिव्ह निघाले, तर त्यांना व्यवस्थित हाताळण्यात वैद्यकीय यंत्रणा आज सज्ज आहे.
परंतु, ही संख्या रोज 40 हजारच्या घरात गेल्यास तर मात्र राज्यातील परिस्थिती बिकट होईल.
बेड, ऑक्सिजन, औषधी यांची अडचण निर्माण होईल.
परिणामी मृत्यूदर (Mortality) देखील वाढेल असं देखील अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना स्पष्ट केले आहे.

यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले, मागील लाटेचा अनुभव लक्षात घेता, सर्व राजकीय पक्ष व संघटनांनी गर्दी होणारे राजकीय सभा, मोर्चे त्वरित स्थगित करावेत.
असे आवाहन त्यांंनी केले आहे.
तसेच, अन्य कार्यक्रम नियमांत राहून साजरे करू शकता, मात्र, आता तिसरी लाट येऊच द्यायची नाही.
सणांवर निर्बंध लावावेत असे कोणाला वाटेल? पण आपले आरोग्य, प्राण महत्त्वाचा.
उत्सव नंतरही साजरे करू, असे मुख्यमंत्री यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, गौरी-गणपतीच्या पार्श्वभूमीवर लोक प्रवास करीत आहेत.
आताच नियम पाळले नाहीत, तर तिसऱ्या लाटेला कोणीही रोखू शकणार नाही.
थोडी बेफिकिरी राज्याला प्रचंड मोठ्या संकटात टाकू शकते.
याची जाणीव लोकांना करून देण्याचे काम राज्यकर्त्यांचे आहे.
असं एका वरिष्ठ सचिवांनी स्पष्ट केलं आहे.

 

Web Title : Maharashtra Lockdown | so lockdown inevitable state currently 4 5 thousand patients are found every day

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Corona Vaccine | क्यूबामध्ये 2 वर्षांच्या मुलांना सुद्धा कोरोना व्हॅक्सीन देणे सुरू, बनला जगातील पहिला देश

Pankaja Munde | करुणा शर्मा प्रकरणावर पंकजा मुंडेचं ट्विट; म्हणाल्या – ‘परळी सुन्न आहे…’

OMG ! एकाच मुलासोबत लग्न करण्यासाठी आडून बसल्या दोन मुली, मग टॉस उडवून निवडली वधू!