औरंगाबादेत अब्दुल सत्तार यांचा कॉंग्रेसला धक्का, या अपक्ष उमेदवाराला पाठींबा

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – औरंगाबाद येथून कॉंग्रेसमध्ये बंडखोरी केलेले आमदार अब्दुल सत्तार यांनी कॉंग्रेसला आणखी एक धक्का दिला आहे. त्यांनी कॉंग्रेसच्या उमेदवाराला नव्हे तर अपक्ष म्हणून निवडणूक लढविणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांना पाठींबा दिला आहे.

अब्दुल सत्तार यांनी कॉंग्रेसचा राजीनामा देत लोकसभा निवडणूक अपक्ष लढविणार असल्याची भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर नाट्यमयरित्या त्यांनी भाजपमधील गिरीष महाजन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बड्या नेत्यांची भेट घेतली होती. ते भाजपच्या गोटात दाखल होणार असल्याची चर्चा रंगली होती. दरम्यान त्यांना राधाकृष्ण विखे पाटील आणि अशोक चव्हाण यांची निकटवर्तीय मानले जाते. परंतु सत्तार यांचा विचार न करता पक्षश्रेष्ठींनी सुभाष झांबड यांना उमेदवारी दिली. त्यामुळे ते नाराज झाले होते. त्यांनी नंतर निवडणूकीच्या रिंगणातून माघार घेतली होती. त्यानंतर त्यांनी आता आपली भूमीका स्पष्ट केली असून रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांना आपला पाठींबा जाहिर केला आहे. हर्षवर्धन जाधव औरंगाबादमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.

Loading...
You might also like