महाराष्ट्रात ‘या’ ३ नेत्यांपैकी १ जण बनणार विरोधी पक्षनेता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्षनेतेपदासाठी क़ॉंग्रेसकडून ३ नावांची सध्या चर्चा सुरु आहे. कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस गटनेता आणि विरोधी पक्षनेते निवडीसाठी आमदारांची बैठक पार पडणार आहे.

विखे पाटील यांनी आपल्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्षनेते पद रिक्त झालं. त्यामुळे या पदावर आता कॉंग्रेसच्या कोणत्या नेत्याची वर्णी लागेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कॉंग्रेसमध्येही बऱ्याच नेत्यांनी आपली ताकद लावली आहे. परंतु कॉंंग्रेसमध्ये विरोधी पक्षनेतेपदासाठी विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्या नावाची चर्चा सध्या सुरु आहे. आज होणाऱ्या बैठकित यावर निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान यापदावर नेमकी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

सुजय विखे पाटील यांना कॉंग्रेसमधून लोकसभा उमेदवारी मिळण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रयत्न केले. परंतु निवडणूकीच्या या खेळात त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यानंतर सुयजयने भाजपात प्रवेश केला. निवडणूकीत मात्र त्यांनी कॉंग्रेसमध्ये राहूनच नगर आणि शिर्डीमध्ये युतीच्या बाजूने ताकद लावली. त्यानंतर त्यांच्या भूमिकेमुळे कॉंग्रेसने बाळासाहेब थोरातांना पाठबळ देण्यास सुरुवात केली.