निवडणुका तोंडावर, मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातून ‘ही’ धक्कादायक माहिती समोर 

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा अगदी तोंडावर येऊन ठेपल्या असताना डिजिटल इंडियाच्या गोष्टी करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यात साधारण २०० मतदान केंद्रांवर वीजच नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. याबाबतची माहिती एका वृत्तसमूहाने दिली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, नागपुरात ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. पण वीजबिल थकल्यामुळे मतदान केंद्र असलेल्या शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शहरातच ही अवस्था तर बाकी ठिकाणी काय परिस्थिती असेल असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे प्रशासनावर मोठी टीका देखील करण्यात येत आहे.

दरम्यान, या सगळ्या प्रकारामुळे प्रशासनावर विजेची तात्पुरती व्यवस्था करण्याची नामुष्की ओढवली आहे. साधारणत: २०० मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी वीजेची तात्पुरती व्यवस्था होणार आहे. याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी माहिती दिली आहे. या वीजपुरवठ्याबाबतच्या या तात्पुरत्या उपायोजनेमुळे निवडणुका तर पार पडतील, पण त्यानंतर विद्यार्थांचं काय? असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like