भाजपलाच नव्हे, तर त्यांना मदत होईल अशांनाही मतदान करू नका ; राज ठाकरे

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला मतदान करू नका. तर भाजपाला मतदान होईल अशा कोणालाही मतदान करू नका. असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोलापूर येथी जाहीर सभेत म्हंटले असून, वंचित बहुजन आघाडीवर अप्रत्यक्षपणे भाष्य केले आहे.

लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. ११ एप्रिल रोजी देशातील पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. आता १८ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याचदरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सोलापूर लोकसभा मतदार संघात जाहीर सभा झाली. त्यावेळी, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला मतदान करू नका. तर भाजपाला मदत होईल अशा कोणालाही मतदान करू नका. असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले.

विशेष म्हणजे, सोलापूर मतदार संघात यावेळी तिरंगी लढत होणार आहे. वंचित बहुजन आघाडी कडून प्रकाश आंबेडकर तर भाजपा कडून सिद्धेश्वर महाराज तर काँग्रेस कडून सुशीलकुमार शिंदे निवडणूक लढवत आहेत. आणि वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे असा आरोप काँग्रेसकडून सातत्याने करण्यात येत असतो. याचदरम्यान राज ठाकरेंचे हे वक्तव्य म्हणजे लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मतादून करा असे अप्रत्यक्ष आवाहन त्यांनी केल्याचे स्पष्ट होते.