महाराष्ट्रातील ‘या’ जागेवर लागू शकतो सर्वात वेगवान निकाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीचे पाच टप्पे पार पडले असून आणखी दोन टप्पे बाकी आहेत. परंतु मतदानप्रक्रिया संपण्याआधीच अनेकांना निवडणूक निकालाची उत्सुकता लागली आहे. कोण, कुठे, कोणत्या मतदारसंघात किती मतांनी विजयी होईल, कोण पराभूत होईल याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी लागणार आहे. यात महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास गडचिरोलीचा निकाल सर्वात अगोदर लागू शकतो. दुपारी एकपर्यंत या मतदारसंघाचा निकाल जाहीर होऊ शकतो. या मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे केवळ पाच उमेदवार उभे आहेत, त्यामुळे या ठिकाणी सर्वात आगोदर निकाल घोषित होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे नामदेव उसेंडी आणि भाजपचे अशोक नेते यांच्यात सरळ लढत आहे.

या ठिकाणी देखील निकाल लवकर लागू शकतो
गडचिरोली प्रमाणेच सातारा, पालघर, लातूर, नंदूरबार, रत्नागिरी या मतदारसंघांचा निकाल लवकर लागू शकतो. साताऱ्यात देखील सर्वाधिक कमी उमेदवार उभे आहेत. पंतप्रधान कोण होणार यावर देखील आता अंदाज बांधले जात आहेत. विरोधकांनी तशी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. त्यासाठी विरोधकांनी देखील आपला उमेदवार ठरवण्यासाठी २१ तारखेला दिल्लीत बैठक बोलावली आहे.

दरम्यान, या बैठकीला तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी, बसपा अध्यक्षा मायावती, अखिलेश यादव, शरद पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Loading...
You might also like