Corona : ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! दिल्ली-NCR सह ‘या’ 6 राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांना RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणे ‘अनिवार्य’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असताना महाविकास आघाडी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. परराज्यातून येणार्‍या प्रवाशांना आता ४८ तासांच्या आतील आयटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत बाळगणे बंधनकारक केले आहे.

सरकारने गोवा, उत्तराखंड, गुजरात, केरळ, दिल्ली आणि राजस्थान या राज्यांतून महाराष्ट्रात येणार्‍या प्रवाशांना आता ४८ तासांच्या आतील आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्याचा आदेश दिले आहेत. तसेच ज्या प्रवाशांकडे ४८ तासांच्या आतील कोविड चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट नसेल, त्यांची रेल्वे प्लॅटफॉर्मवरच अ‍ँटीजन चाचणी करण्याचे आदेश राज्य शासनाने रेल्वेला दिले आहेत.

रेल्वे या ६ संवेदनशील राज्यातून महाराष्ट्रात निघणार्‍या एक्सप्रेसची आणि त्यातील प्रवाशांची सर्व माहिती ४ तास आधी राज्य शासनाला कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रवासी महाराष्ट्रातील कोणत्या रेल्वे स्थानकावर उतरणार आहे, याची माहिती रेल्वेने राज्य सरकारला द्यायची आहे. रेल्वेने केवळ आरक्षित तिकीट असणार्‍यांना प्रवासाची परवानगी द्यावी. आरक्षित तिकीट नसणार्‍यांना प्रवास करु देऊ नका, असे आदेश राज्य सरकाने अधिसूचना काढत रेल्वे प्रशासनाला दिले आहे.