महाराष्ट्र : लिव्ह-इन पार्टनरने केली प्रेयसीची हत्या ! भिंतीत गाडला मृतदेह

पालघर : महाराष्ट्रातील पालघरच्या वृंदावन दर्शन कॉम्प्लेक्समध्ये एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन पार्टनरची कथित प्रकारे हत्या करून तिचा मृतदेह फ्लॅटच्या भिंतीत गाडला. ही घटना समोर आल्यानंतर लोक हैराण झाले आहेत. वृंदावन दर्शन कॉम्प्लेक्सच्या फ्लॅट नंबर 101 मध्ये सूरज हरमलकर आणि त्याची लिव्ह इन पार्टनर अमिता मोहिते रहात होते.

आजूबाजूच्या लोकांचे म्हणणे आहे की, खुप दिवसांपासून फक्त सूरजच दिसत होता, अमिता दिसत नव्हती. पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनंतर जेव्हा पोलिस तपासासाठी सूरजच्या फ्लटवर आले तेव्हा तिथे पोलिसांसोबत अ‍ॅम्ब्युलन्स, पोलीस फोटोग्राफर आणि फॉरेन्सिक एक्सपर्टसुद्धा होते. पोलीस आपल्या सोबत मजूर सुद्धा घेऊन आले होते.

फ्लॅटच्या बाहेर गर्दी आणि पोलिसांसोबत सूरजला पाहून आजूबाजूच्या लोकांमध्ये अनेक प्रश्न होते पण प्रकरण काय आहे समजत नव्हते. काही वेळानंतर जेव्हा पोलिसांनी तोडफोड केल्यानंतर एक मृतदेह बाहेर आणला तेव्हा चित्र जवळपास स्पष्ट झाले. हा मृतदेह 32 वर्षीय अमिताचा होता. सूरज आणि अमिता या फ्लॅटमध्ये भाड्याने रहात होते.

पोलिसांनी भिंत फोडून अमिताचा मृतदेह बाहेर काढला. हा मृतदेह खुप दिवसांपासून लपवण्यात आला होता. मृतदेह चार महिने जुना असल्याचे सांगितले जात आहे. अमिताचा मृतदेह अर्धा सडलेला होता. पोलिसांनी मृतदेह म्हणून जे काही काढले ते हाडांचा गठ्ठ्यासारखे होते. पोलिसांनी अमिताचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.

या हत्येमागे सूरजचा हात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, तपासानंतर समजू शकते की, अमिताची हत्या कुणी आणि का केली. प्रकरण समोर आल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. जर सूरजने अमिताची हत्या केली असेल तर इतक्या दिवसांपासून तो कसा अमितासोबत रहात होता. दोघे मोठ्या कालावधीपासून सोबत रहात होते मग हत्या का केली. या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलिसांच्या तपासानंतरच समजू शकतात.