Maharashtra Mantralaya | धक्कादायक ! मंत्रालयाच्या उपहारगृह परिसरात आढळल्या दारुच्या बाटल्या; खमंग चर्चेला उधाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Mantralaya | राज्याचा कारभार जिथून हाकला जातो त्या मंत्रालयात (Maharashtra Mantralaya) पुन्हा एकदा दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत. त्रिमूर्ती पुतळ्याच्या मागे या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत. या भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या बाटल्या आणल्या का? हा प्रश्न उपस्थित होतोय. यापूर्वी देखील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर बसण्यासाठी असलेल्या व्हरांड्यात रिकाम्या बाटल्या आढळून आल्या होत्या. मात्र मंत्रालयात कडेकोट सुरक्षा तपासणी होत असताना देखील या बाटल्या येतात कशा? असा प्रश्न उपस्थित होतोय. या प्रकारामुळे खमंग चर्चेला उत आला आहे.

मंत्रालयात राजपात्रित अधिकाऱ्यांच्या उपहारगृहाच्या (canteen area) खालील बाजूस एक खोली आहे. तिथे हे धक्कादायक चित्र समोर आले आहे. बातमी पसरल्यानंतर तात्काळ स्वछता कामगारांनी तिथल्या दारूच्या बाटल्या उचलायला सुरुवात केलीय. महाराष्ट्रातील अनेक भागातून नागरिक मंत्रालयात (ministry) अनेक कामानिमित्त येत असतात. मंत्रालयात तर यांना नियमावली प्रक्रियेशिवाय आतमध्ये प्रवेश मिळत नाहीत. कडक तपासणी करून आतमध्ये प्रवेश दिला जातो. इतक्या कडक तपासणी असून सुद्धा दारूच्या बाटल्या आत गेल्या कशा? असा सवाल उठवला जातोय. मात्र या प्रकाराबाबत चोकशी होणार का? हे अजून अस्पष्ट आहे.

Web Title :- Maharashtra Mantralaya | shocking liquor bottles found in mantralaya canteen area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ujjwala Yojana | उज्ज्वला योजना 2.0 : जाणून घ्या कशी लाभदायक आहे ही सरकारी योजना आणि तुम्ही कसा घेऊ शकता लाभ

Indo-Tibetan Border Police | कडक सॅल्यूट ! उच्चाधिकारी बनलेल्या मुलीला पाहून PI वडिलांनं केला ‘सलाम’

Murder in Alandi | तरुणाचे हात-पाय बांधून फेकले इंद्रायणी नदीत, खून प्रकरणात FIR