ब्रेन डेड तरुणाचे अवयव नेण्यासाठी आलेल्या ‘चार्टर्ड’ विमानाचा अपघात

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – चार्टर्ड विमान ब्रेन डेड झालेल्या तरुणाचे अवयव नेण्यासाठी नांदेडला निघाले तेव्हा विमानाचा अपघात झाला. झाले असे की, चार्टर्ड विमान लॅंडिंग करताना धावपट्टीवरून घसरले आणि थेट धावपट्टीवरून गवतात शिरुन चिखलात फसले. ही घटना बुधवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. त्यावेळी पाऊस सुरु होता.

मिळालेल्या माहितीनूसार, मु्ंबईहून एक एअर अँब्युलन्स आणि एक चार्टर्ड विमान नांदेडला आले होते. एअर अँब्युलन्स सुखरुप उरतले मात्र, चार्टर्ड विमान लॅंडिंग करताना घरसले आणि अपघात घडला. अपघात घडताच तेथील कर्मचारी घटनास्थळी पोहचले आणि त्या विमानात असलेल्या काही डॉक्टर, पायलट, को-पायलट यांना सुखरुप बाहेर काढले. यानंतर फसलेल्या विमानाला क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.

सुत्रांना दिलेल्या माहितीनूसार, अपघात नेमका कसा घडला हे अजूनही समजले नाही. दोन विमानाच्या मदतीने मुंबईतील फोर्टीस हॉस्पिटलमध्ये हृदय आणि अपोलो हॉस्पिलटलमध्ये लिव्हर नेले जाणार होते पण नांदेडला पोहचण्याआधीच अवयवदाता ओम काळे याचे निधन झाले होते.

Loading...
You might also like