Coronavirus Lockdown : YES BANK घोटाळ्यातील वाधवान कुटुंबीय महाबळेश्वरला, गृह मंत्रालयाच्या विशेष सचिवांचं ‘लेटर’ मिळाल्यानं खळबळ, चौकशी होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून सरकार कठोर पावलं उचलत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने राज्याच्या आणी जिल्ह्यांच्या सीमा सील केल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यांच्या सीमेवर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. राज्यात संचारबंदी असताना देखील येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबातील तब्बल 23 लोक महाबळेश्वरला आलेले सापडले. विशेष म्हणजे त्यांच्याकडे मत्रालयाचे पत्र असल्याने त्यांना प्रवासात कोणीही अडवले नाही, असे वृत्त एका मराठी वृत्त वाहिनीने दिले आहे.


महाबळेश्वर प्रशासकीय यंत्रणेकडून तपासणी करण्यात आली त्यावेळी हे कुटुंब एका बंगल्यात सापडले. त्यांना तेथून हलवले असून पाचगणीतील रुग्णालयात भरती करण्यात आले. सर्वांवर 188 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, वाधवान कुटुंबातील 23 लोकांना खंडाळा ते महाबळेश्वर जाण्याची परवानगी कशी मिळाली याची चौकशी करणार असल्याचे ट्विट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. तर भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी याची चौकशी करण्याच्या मागणीचे पत्र राज्यपालांना दिलं आहे.

कोणकोण महाबळेश्वरला आले
कपील वाधवान, अरुणा वाधवान, वनिता वाधवान, टीना वाधवान, धीरज वाधवान, कार्तिक वाधवान, पूजा वाधवान, युविका वाधवान, अहान वाधवान, शत्रुघ्न घागा, मनोज यादव, विनीदी शुक्ला, अशोक वाफेळकर, दिवाण सिंग, अमोल मंडल, लोहित फर्नांडिस, जसप्रीत सिंह अरी, जस्टीन ड्मेलो, चंद्रकांत चौधरी, प्रदीप कांबळे, एलिझाबेथ अय्यापिल्लाई, रमश शर्मा, तारकर सरकार