दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी ?

मुंबई : पोलिसनमा ऑनलाईन – राज्यात प्लास्टिकबंदीनंतर आता दूध पिशव्यांवर देखील बंदी आणण्याचा सरकार विचार करत असल्याची माहिती मिळत आहे. पुढील महिन्यात याची अंमलबजावणी होणार असल्याचे बोलले जात आहे. दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांच्या पुनर्वापराबाबतही राज्य सरकारचा विचार आहे. त्यामुळे ग्राहकाकडून दूध घेताना पन्नास पैसे जास्त घेऊन ती पिशवी जमा केल्यानंतर त्याला पुन्हा ते पैसे परत दिले जातील. यामुळे ग्राहक ती पिशवी फेकून देणार नाही आणि त्यामुळे प्लास्टिक कमी होण्यास मदत होईल, असा यामागचा विचार असल्याचे सांगितले जात आहे.

महाराष्ट्रात दररोज एक कोटी प्लास्टिक पिशव्या तयार केल्या जातात. याचे दररोजचे ३१ टन प्लास्टिक होते. त्यामुळे दररोज इतक्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिक निर्मिती झाल्याने प्लास्टिक बंदीला जवळपास हरताळ फासल्यासारखेच आहे, असे म्हटले जात असल्याने शासनाने हा निर्णय घेतल्याचे समजते. यामुळे या सर्व बाबी लक्षात घेऊन पॅकेजिंग दुधासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक पिशव्याच्या रिसायकलिंगची कडक अंमलबजावणी महाराष्ट्र सरकार करणार आहे. यासंबंधात पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि उत्पादक आणि दूध पुरवठादारांसह बैठक घेतली होती. त्यानंतर हा निर्णय घेणार असल्याचे समजत आहे.

दरम्यान, याविषयी बोलताना पर्यावरण मंत्री रामदास कदम म्हणाले कि, प्लॅस्टिक मुक्त समाज सक्षम करण्यासाठी आम्हाला एकापेक्षा अनेक पावले उचलावी लागतील. यासाठी काही कंपन्यांनी आधीच पावले उचलली असल्याने आपण देखील यात साथ द्यायला हवी.

सिने जगत –

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

अभिनेत्रीने तिच्या हाताने उचलला तिचा लेहंगा, पुढे झाले असे काही

..म्हणून ‘बिग बॉस’ बॅन करण्यासाठी वकिलाची तक्रार दाखल

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन