Maharashtra Minister Atul Save | वसतिगृह अधीक्षकांना नियमानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करणार – मंत्री अतुल सावे

मुंबई : Maharashtra Minister Atul Save | इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत विजाभज प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रमशाळेत कार्यरत वसतिगृह अधीक्षकांना नियमानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करण्यात येईल, असे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

विधानपरिषदेत सदस्य शशिकांत शिंदे (MLC Shashikant Shinde) यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री सावे (Maharashtra Minister Atul Save) यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे
उर्वरित वसतिगृह अधीक्षक यांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्यात येणार आहे. तसेच आश्वासित प्रगती योजना
देखील लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याबाबतची कार्यवाही विभागाकडून करण्यात येईल, असेही मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.

या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य प्रा. राम शिंदे (MLC Ram Shinde), महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी सहभाग घेतला.

Web Title :- Maharashtra Minister Atul Save | Senior pay scale will be implemented for hostel superintendents as per rules – Minister Atul Save

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Chief Minister Eknath Shinde | प्रकल्पग्रस्तांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक उन्नतीसाठी राज्य शासन उपाययोजना करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

NCP Chief Sharad Pawar | शरद पवारांना कधी ‘फ्रेंच कट’ दाढीत पाहिलं का?, सुप्रिया सुळेंनी शेअर केला दुर्मिळ फोटो

Ajit Pawar On Shinde Fadnavis Govt | विकासाच्या ऐवजी राज्यातल्या गुन्ह्यांचा वेग डबल; सत्ता टिकविण्यासाठी डबल इंजिन सरकारची तडजोड सुरु – अजित पवार