महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करतायेत : जितेंद्र आव्हाड

पोलिसनामा ऑनलाईन टीम – मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या हाताबाहेर गेल्याचा आरोप केला होता. त्यानंतर सरकार सर्वच ठिकाणी अपयशी ठरल्याचे म्हणत भाजपने राज्यभरात आंदोलनही केले होती. त्यावरुन आता पुन्हा राजकारण पेटले आहे. काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

नीति आयोगाने मुंबईचे मॉडेल देशभर राबविण्यास सांगितले आहे. तर दुसरीकडे गुजरातमधील रुग्णालयांची अवस्था अंधार कोठडीपेक्षाही बिकट आहे, असे गुजरात न्यायालयाने म्हटले आहे. तरी काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करत आहेत, असे आव्हाड त्यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईतील कोरोनाची परिस्थिती ठाकरे सरकारच्या हाताबाहेर गेल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.

महाराष्ट्रातही मुंबईत करोना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. अशा स्थितीत ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री नवीन त्यांना प्रशासकीय अनुभव नाही. पहिल्या लॉकडाउनपासून धोरणात्मक निर्णय घेण्यात या सरकारने चुका केल्या असेही फडणवीस यांनी टीका केली होती.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like