फोन टॅप होत असल्याचा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा दावा, मध्यरात्री केलेल्या ट्विटमुळे खळबळ

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी फोन टॅप होत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री ट्वीट करत आपला फोन टॅप होत असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या दाव्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हे ट्विट केलं आहे. आपला फोन टॅप केला जात आहे. तसेच कोणत्यातरी संस्थेकडून माझ्या व्हॉटसअ‍ॅप वर निगराणी ठेवली जात आहे असं या ट्विट मध्ये आव्हाड यांनी म्हंटल आहे.

दरम्यान , फोन टॅप विरोधात संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले होते. तसेच एका मंत्र्यांचे नाव घेत त्यांचा फोन टॅप होत असल्याचंही राऊत यांनी म्हंटल होत. मध्यतयारीच्या काळात भाजप सरकारच्या काळातील फोन टॅपिंगच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महाविकास आघाडी सरकारकडून दिले होते. तर यापूर्वी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त पार पडलेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनीदेखील लोकांच्या फोन टॅपिंगची फोन गरज नसल्याचं म्हणत टोला लगावला होता. सहकारी म्हणायचं आणि फोन टॅप करायचे असं मी करणार नाही, असंही ते म्हणाले होते.