Maharashtra Minister Tanaji Sawant | महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी शिंदे, फडणवीस अन् माझ्यात 150 बैठका; तानाजी सावंत यांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात झालेल्या सत्तानाट्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) अडीच वर्षात कोसळले. शिवसेनेच्या (Shivsena) 40 आमदारांनी वेगळी भूमिका घेत थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वालाच आव्हान दिले. आमदारांनी पाठिंबा काढल्याने ठाकरे सरकार अल्पमतात आल्याने हे सरकार (Maharashtra Politics News) पडले. हे सरकार पाडण्यासाठी 100-150 बैठका मी घेतल्या असा गौप्यस्फोट मंत्री तानाजी सावंत (Maharashtra Minister Tanaji Sawant) यांनी केला आहे. सरकार उलथवल्याशिवाय शांत बसणार नाही अशी प्रतिज्ञा मी घेतली होती असेही तानाजी सावंत (Maharashtra Minister Tanaji Sawant) यांनी सांगितले.

धाराशीव जिल्ह्यातील परांडा येथे आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेत तानाजी सावंत (Maharashtra Minister Tanaji Sawant) यांनी हा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, 2019 च्या निवडणुकीत जनतेने भाजप-शिवसेना युतीला (BJP-Shiv Sena Alliance) कौल दिला होता. मात्र शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी मिठाचा खडा टाकला आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन केली. त्या सरकारमध्ये मला स्थान दिले नाही. त्यामुळे मी मातोश्रीवर (Matoshree) जाऊन त्यांना सांगून आलो की मी आता पुन्हा या मातोश्रीची पायरी चढणार नाही.

30 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) झाला. त्यातून मला लांब ठेवले. त्यामुळे संतप्त होऊन मी फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या आदेशाने 3 जानेवारीला बंडखोरी करीत भाजपच्या मदतीने जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली. त्यानंतर सगल दोन वर्षे हे सरकार पाडण्यासाठी कामाला लागलो. फडणवीस आणि एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत सतत बैठका घेतल्या. जवळपास 100-150 बैठका झाल्याचे सावंत यांनी सांगितले.

तानाजी सावंत पुढे म्हणाले, 2019 ला निवडणुका झाल्या, जनतेने शिवसेना-भाजप युतीला 180 हून
अधिक उमेदवार निवडून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वावर विश्वास
ठेवून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजप नते देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावून जनतेकडे मत मागितली.
2014 च्या सत्ताधाऱ्यांना पुन्हा 2019 मध्ये सत्तेत येण्याचा जनादेश लोकांनी दिला.
मात्र, शरद पवार यांनी मिठाचा खडा टाकला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांना ही आघाडी करु नका असं सांगणारा
पहिला आमदार मी होतो. साहेब त्यांच्या नादाला लागू नका नाहीतर आत्मघात ठरेल असे मी त्यांना सांगितले.
तसेच पक्षाचे वाटोळे होईल हा निर्णय घेऊ नका, असे सांगणारा पहिला शिवसैनिक आणि आमदार मीच होतो.
हा सल्ला दिल्यानेच मला मंत्रिमंडळापासून दूर ठेवल्याचा आरोप तानाजी सावंत यांनी केला.

देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास दीडशे बैठका झाल्या.
याच दरम्यान मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील प्रत्येक आमदाराचे मी मन वळवत होतो आणि
उघड माथ्याने हे करत होतो. कुणाला लपवून करत नव्हतो, असंही तानाजी सावंत यांनी यावेळी सांगितले.

Advt.

Web Title :- Maharashtra Minister Tanaji Sawant | maharashtra minister tanaji sawants secret burst 150 meetings were held to topple the mahavikas aghadi government

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shambhuraj Desai | कोयना धरणग्रस्तांच्या प्रश्नाबाबत एक महिन्यात मुख्यमंत्री महोदयांसोबत बैठक लावणार – पालकमंत्री शंभूराज देसाई

Pune Crime News | आईनेच केला पोटच्या ४ वर्षाच्या मुलीचा चाकूने भोसकून खून; हडपसरमधील ससाणेनगर येथील धक्कादायक घटना

Radhakrishna Vikhe-Patil | शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राधाकृष्ण विखे-पाटील