Maharashtra MLA Disqualification Case | विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकावर ठाकरे गटाचा आक्षेप, म्हणाले – ‘नार्वेकरांचे वेळापत्रक म्हणजे वेळकाढूपणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra MLA Disqualification Case | आमदार अपात्रतेच्या सुनावणीचे वेळापत्रक ठरलं आहे. शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट या पक्षातील आमदारांना विधानसभा अध्यक्षांकडून सुनावणीचे पुढील वेळापत्रक ईमेलद्वारे पाठवण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलेल्या वेळपत्रकावर ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. आमदार अपात्रतेप्रकरणी नार्वेकरांचे वेळापत्रक म्हणजे वेळकाढूपणा असल्याची टीका ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी केली आहे. (Maharashtra MLA Disqualification Case)

अनिल परब म्हणाले, विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलेलं हे वेळापत्रक ही धूळफेक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या दट्ट्यानंतर आता तारखा पडत आहेत. आम्ही प्रतिज्ञापत्रक दिले आहे पुरावे बघण्याची गरज नाही. वेगवेगळी सुनावणीची गरज नाही. 23 नोव्हेंबरपर्यंतच्या तारखा कळवण्यात आल्या आहेत. त्यानंतर उलट तपासणी सुरु होणार आहे मात्र उलट तपासणी किती वेळ चालणार याची माहिती नाही. एक महिन्याच्या कालावधीत हे प्रकरण संपवायला पाहिजे. आतापर्यंत निकाल लागायला पाहिजे होता. आमदार अपात्र होतील यामुळे वेळकाढूपणा केला जात असून हे वेळापत्रक ज्यावेळी सुप्रीम कोर्टात जाईल त्यावेळी आम्ही आमची बाजू मांडू. (Maharashtra MLA Disqualification Case)

पक्षपात न करता निर्णय घ्यावा

विधानसभा अध्यक्ष हे कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांसमोर सर्वांचा गुन्हा सारखाच आहे. राज्यपाल, मुख्यमंत्री, आमदार, प्रतोद यांच्या चुका सारख्याच आहेत. यामुळे विधानसभा अध्यक्षांनी पक्षपात न करता निर्णय द्यावा, अशी मागणी अनिल परब यांनी केली आहे.

वेळापत्रकावर आक्षेप घेणार

विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटांच्या आमदारांना वेळापत्रक पाठवले आहे. या वेळापत्रकावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेतल्यास अंतिम सुनवणी घेतल्यास अंतिम सुनावणीसाठी एवढा वेळ का? असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला आहे. त्यामुळे पुढील सुनावणीच्यावेळी ठाकरे गटाकडून वेळापत्रकावर आक्षेप घेतला जाणार आहे.

आमदार अपात्रतेच्या सुनावणीचे वेळापत्रक

  • 6 ऑक्टोबर 2023
    याचिकाकर्ते मूळ शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे 23 सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आलेल्या अतिरिक्त प्रतिज्ञापत्रावर एकनाथ शिंदे गटाचे वकील त्यांचे उत्तर/म्हणणे दाखल करतील.
  • 13 ऑक्टोबर 2023
    अपात्रतेबाबतच्या सगळ्या पिटीशनची सुनावणी एकत्र व्हावी या ‘मूळ शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे’ मागणी करण्यात आलेल्या अर्जावर, 23 सप्टेंबर 2023 रोजी ‘मूळ शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे’ अतिरिक्त युक्तिवाद व कागदपत्रे रेकॉर्ड वर आणण्याऱ्या अर्जावर दोन्ही पक्षांनी आपले लेखी म्हणणे मांडावे व त्यावर युक्तिवाद होतील.
  • 13 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर 2023
    अपात्रतात सुनावणी बाबत विधानसभा सचिवालयात दाखल असलेल्या कागदपत्रांची, आदेशांची पाहणी करण्यासाठी, कागदपत्रे शोधण्यासाठी दोन्ही पक्षांच्या वकिलांना संधी देण्यात येईल. (म्हणजे हा कालावधी केवळ ऑफिशियल कागदपत्रे पाहणी करण्यासाठी आहे)
  • 20 ऑक्टोबर 2023
    अपात्रतेबाबतच्या सगळ्या पिटीशनची सुनावणी एकत्र व्हावी, 23 सप्टेंबर 2023 रोजी ‘मूळ शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे’ अतिरिक्त युक्तिवाद व कागदपत्रे रेकॉर्डवर आणण्याची मागणी करणाऱ्या ‘मूळ शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे’ दाखल अर्जांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय आदेश जाहीर करतील.
  • 27 ऑक्टोबर 2023
    दाखल झालेल्या कागदपत्रांपैकी कोणते डॉक्युमेंट्स ऍडमिट करायचे व कोणते नाकारायचे यावर दोन्ही पक्षांनी आपापले म्हणणे सादर करावे. ( म्हणजे यादिवशी काही कामकाज होणार नाही तर केवळ लेखी म्हणणे सादर करण्याची कार्यालयीन प्रक्रिया होईल)
  • 6 नोव्हेंबर 2023
    अपात्रतेबाबत निर्णय घेतांना काय मुद्दे (issues) विचारात घेतले पाहिजेत यावर दोन्ही पक्षांनी आपले लेखी
    म्हणणे सादर करावे व एकमेकांना त्याच्या कॉपीज द्याव्यात.
  • 10 नोव्हेंबर 2023
    अपात्रतेबाबत निर्णय घेतांना काय मुद्दे (issues) विचारात घेऊन नक्की केले पाहिजेत यावर विधानसभा अध्यक्ष
    दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकतील.
  • 20 नोव्हेंबर 2023
    प्राथमिक तपासणी (examination in chief) घेण्यासाठी दोन्ही पक्षांनी त्यांच्या साक्षीदारांची यादी व प्रतिज्ञापत्र
    दाखल करावेत. (म्हणजे यादिवशी सुद्धा काहीही न होता केवळ प्रक्रिया…

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mohit Kambojs Criticized Ajit Pawar | फडणवीसांचे जवळचे सहकारी कंभोज यांनी थेट अजित पवारांना डिवचले, मात्र काही वेळातच डिलीट केले ट्विट