Maharashtra MLC Election 2022 | ‘केंद्रीय तपास यंत्रणांचा आमदारांना फोन, विधानपरिषदेसाठी दबाव’; नाना पटोलेंचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra MLC Election 2022 | राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीचे (Maharashtra MLC Election 2022) वारे वाहत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असल्याचं दिसत आहे. अशातच विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून (BJP) केंद्रीय तपास यंत्रणांचा (Central Investigation Mechanisms) दुरुपयोग होत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. त्याचबरोबर ‘केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) आमदारांवर दबाव टाकण्यासाठी फोन करत असल्याचं,’ नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

 

त्यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले, “केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीतील आमदारांवर दबाव टाकण्यासाठी फोन करत असल्याचं ते म्हणाले. तसेच, याबाबत सगळी माहिती आमच्याकडे आहे. वेळ आली की ही माहिती समोर आणू. भाजपने कितीही अडथळे निर्माण केले तरी विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार विजयी होतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. (Maharashtra MLC Election 2022)

 

पुढे नाना पटोले म्हणाले, ”आमच्या हाती आलेल्या रेकॉर्डनुसार ईडी आणि सीबीआय यांचा दुरुपयोग कसा सुरु आहे हे निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला समजत आहे. भाजप सीबीआय (CBI) आणि ईडीचा (ED) हत्यार म्हणून वापर करत आहे. ही लोकशाहीसाठी घातक असल्याचं ते म्हणाले. “सुप्रीम कोर्टाचे (Supreme Court) न्यायमूर्ती मीडियासमोर येऊन न्याय मागत आहे, यावरुन काय परिस्थिती आहे याचा अंदाज येऊ शकतो. आम्ही जनतेच्या दरबारातच ही गोष्ट घेऊन जाऊ. हे लोक सत्तेचा कसा गैरवापर करतात हे त्यांच्यासमोर मांडू.” असं नाना पटोले म्हणाले.

 

पटोलेंचे आरोप बिनबुडाचे –

दरम्यान, “नाना पटोले यांचे आरोप निराधार आणि बिनबुडाचे आहेत. हातात काही पुरावे नसताना केवळ बोलायचं,
बोलाचीच कढी, बोलाचाच भात अशी या नेत्यांची वक्तव्ये आहेत. त्यांच्या आरोपांना ना आम्ही गांभीर्याने घेतो ना आमदार,”
अशी प्रतिक्रिया भाजप नेते आणि विरोधी पक्षेनेत प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी दिली आहे.

 

Web Title :- Maharashtra MLC Election 2022 | central investigation agency calls
mlas of maha vikas aghadi to pressurized for mlc election 2022 alleges congress maharashtra president nana patole

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा