Maharashtra MLC Election 2022 | ‘…तर विधान परिषदेसाठी एकनाथ खडसेंना मतदान करणार’ – चंद्रकांत पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra MLC Election 2022 | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यात कट्टर राजकीय वैर आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सांगितले तर आपण एकनाथ खडसे यांना मतदान (Maharashtra MLC Election 2022) करणार असल्याचं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या असल्याचं दिसत आहे.

 

चंद्रकांत पाटील म्हणाले, “महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. मी अपक्ष आमदार असलो तरी शिवसेनेच्या (Shivsena) विचाराने वाढलो आहे. त्यामुळे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे सांगतील त्याप्रमाणे मी मतदान करेन, यात एकनाथ खडसे असो की इतर कुणी असो,” असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. (Maharashtra MLC Election 2022)

 

पुढे ते म्हणाले, “एकनाथ खडसे आणि माझ्यात राजकीय तसेच व्यक्तिगत मतभेद आहेत.
त्याचबरोबर अपक्ष आमदार असलो तरी मी शिवसेनेच्या विचारांनी वाढलो आहे.
त्यामुळे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे सांगतील त्यानुसार एकनाथ खडसे असो किंवा इतर कोणी असो, आपण त्याच उमेदवाराला मतदान करू.” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यात नेहमीच एकमेकांवर आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात.
असे असताना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

 

Web Title :- Maharashtra MLC Election 2022 | maharashtra vidhan parishad election 2022 chief minister uddhav thackeray said that will vote for ncp leader eknath khadse say independent mla chandrakant patil

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा