Maharashtra MLC Election 2022 | विधानपरिषद निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून शिवसेनेची खबरदारी; उचललं मोठं पाऊल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra MLC Election 2022 | राज्यसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीकडे (Mahavikas Aghadi) पुरेसे संख्याबळ असताना शिवसेनेच्या (Shivsena) एका उमेदवाराचा पराभव झाला. कारण भाजपकडे (BJP) तिस-या जागेसाठी पुरेसे संख्याबळ नसताना त्यांनी अपक्ष आमदारांना फोडण्यात यशस्वी खेळी केली. आणि भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाले. हा जोराचा फटका आघाडी सरकारला बसला. दरम्यान याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आता शिवसेनेने मोठी खबरदारी घेतली आहे.

 

विधान परिषद निवडणुकीत (Maharashtra MLC Election 2022) सावध भूमिका घेत शिवसेनेने आपल्या आमदारांना पवईतील रेनेसाँ हॉटेलमध्ये ठेवले आहे.
राज्यसभा निवडणुकीत झालेल्या एका जागेच्या पराभवामुळे शिवसेनेनं यावेळी सावध पावले उचलले आहे.
यामुळे काल रात्री उशिरा शिवसेनेचे आमदार (MLA) आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे देखील हॉटेलमध्ये दाखल झाले होते.

 

येत्या 20 जून 2022 रोजी विधान परिषदेसाठी निवडणुक होणार आहे.
यामध्ये कोणता पक्ष बाजी मारतो याची मोठी उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
भाजपने आम्ही सगळ्या जागा जिंकणार असा दावा केला असतानाच आम्हीही सहाच्या सहा जागा जिंकणार असा विश्वास देखील महाविकास आघाडीकडून व्यक्त होताना दिसत आहे.
त्याचबरोबर आम्ही आता दुसरी रणनीती आखली असून या निवडणुकीत चमत्काराची भाषा भाजपकडून करण्यात आली आहे.

 

नवाब मलिक – अनिल देशमुखांना मतदानाचा अधिकार नाकारला –

राज्यसभे पाठोपाठ आता विधानपरिषदेतही राष्ट्रवादीचे नेते, मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि माजी मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मतदानाचा अधिकार मुंबई हाय कोर्टाने (Mumbai High Court) नाकारला आहे.
त्यामुळे राष्ट्रवादीची (NCP) हक्काची 2 मते कमी झाली आहेत.
त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी आणखी काही हालचाली करावे लागणार आहे.

 

Web Title :-  Maharashtra MLC Election 2022 | maharashtra vidhan parishad election shiv sena kept its mlas in a hotel in mumbai mlc election 2022

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा