Maharashtra MLC Election 2022 | ‘अपक्षांना राष्ट्रवादीकडे वळवण्यासाठी रणनीती’ – अजित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra MLC Election 2022 | विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 20 जून रोजी मतदान (Maharashtra MLC Election 2022) होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आमदारांना एकजूट करण्यास कामाला लागले आहेत. महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) सहा तर भाजपकडून (BJP) पाच उमेदवार मैदानात आहेत. अशात संख्याबळानुसार भाजप आणि महाविकास आघाडीलाही अपक्षांची साथ हवीय. यासाठी त्यांची मनधरणी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. विधानपरिषदेच्या व्युहरचनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

“विधान परिषद निवडणुकीसाठी (Maharashtra MLC Election 2022) आमदारांना एकत्र ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मत बाद होणार नाही यासाठी काळजी घेतली जाईल. राज्यसभेत एक मत बाद झाले होते. पहिल्या पसंतीची, दुसऱ्या पसंतीची मते कुणाला द्यायची ते ठरवलं जाईल. महाविकास आघाडीची एकजूट आहे. कुठल्याही प्रकारची अडचण नाही. अपक्षांना काही नेत्यांनी फोन केला हे खरं आहे. मतांची जुळवाजुळव करण्यासाठी ते झाले. काही अपक्षांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बोलतील त्यांना मतदान करू असं स्पष्ट सांगितले असल्याचं,” अजित पवार म्हणाले.

 

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, “राष्ट्रवादीच्या आमदारांची संध्याकाळी बैठक होणार आहे. आमच्या आमदारांवर दबाव आणला असं कुणी फोन करून सांगितले नाही. आमदार निवडून देताना प्रत्येकाकडे आपापला कोटा आहे. राज्यसभेत तिन्ही पक्षाकडे काही मते शिल्लक होती. त्यामुळे एकत्र बसून निर्णय घेणे आवश्यक असल्याचं ते म्हणाले. तसेच, आता शिवसेनेला दोन निवडून आणायचे आहेत. संख्याबळानुसार ते निवडून येतील असं चित्र आहे. आम्हाला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी काही संख्या कमी पडतेय. त्यामुळे अपक्षांना सोबत घेऊन आकडा गाठण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं,” अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं आहे.

“लोकशाहीत आरोप प्रत्यारोप करून मार्ग निघत नाही. अपक्षांना मान सन्मान दिला पाहिजे.
अपक्षांची मते राष्ट्रवादीला कशी मिळतील यावर आमचे लक्ष आहे.
बहुजन विकास आघाडीच्या (Bahujan Vikas Aghadi) नेत्यांना सर्व पक्षांचे नेते जाऊन भेटले आहे.
स्वातंत्र्य विचाराचे जे आहेत त्यांना भेटून मत मिळवणे हे उमेदवाराचे आणि पक्षाचे काम असते,” असं देखील अजित पवार यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Maharashtra MLC Election 2022 | maharashtra vidhan parishad election
strategies to turn independents towards ncp ajit pawar made it clear

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा