Maharashtra MLC Election 2022 | नवाब मलिक, अनिल देशमुखांना मताचा अधिकार हाय कोर्टानं नाकारला; खडसेंचं गणित बिघडणार?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra MLC Election 2022 | राज्यसभेच्या निवडणुकीदरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला नव्हता. त्यामुळे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) दोन मते मिळाली नाहीत. त्याचबरोबर आता महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत (Maharashtra MLC Election 2022) मतदान करता यावं अशी मागणी करण्याची याचिका नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी केली होती. या याचिकेवर देखील मुंबई हाय कोर्टाने (Mumbai High Court) दणका दिला आहे.

 

विधान परिषद निवडणुकीसाठी 20 जून रोजी मतदान होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. अखेर न्यायमूर्ती एन.जे. जमादार (Justice N.J. Jemadar) दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आज निकाल दिला. दोन्ही नेत्यांचा विधान परिषदेसाठी मतांचा अधिकार न्यायालयाने नाकारला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला आणखी एक धक्का बसला आहे.

दरम्यान, मुंबई हाय कोर्टाचे न्यायमूर्ती जामदार यांनी हा निकाल देत दोन्ही नेत्यांना धक्का दिला आहे.
गुरुवारी याबाबतची सुनावणी पूर्ण झाली होती. पण, न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.
याआधी राज्यसभा निवडणुकीत सत्र न्यायालयाने परवानगी नाकारली होती. त्यानंतर आता विधान परिषदेतही तोच परिणाम दिसून आला आहे.

 

राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी दिली आहे.
राष्ट्रवादीकडे मतांचं समीकरण पाहिल्यास सध्या खडसेंना दोन मता्ंची आवश्यकता आहे.
राष्ट्रवादीचे दोन्ही नेते सध्या तुरुंगात आहेत. त्यांना मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला आहे.
भाजप (BJP) देखील खडसे यांना पाडण्यासाठी सज्ज झाली आहे.
अशातच हक्काची दोन मते नाही मिळाल्यामुळे एकनाथ खडसे यांचे गणित बिघडू शकते.

 

Web Title :- Maharashtra MLC Election 2022 | Mumbai bombay high court denies permission to anil deshmukh and nawab malik to vote in maharashtra mlc election 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | विश्रांतवाडी परिसरात मानलेल्या बहिणीला त्रास दिल्याचा जाब विचारल्याने दोघांचा खून; एकाला ढकलून दिल्याचे पाहिल्याने दुसर्‍यालाही मारले

 

Pune Crime | पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, मॉडेलसह 6 पीडित तरुणींची सुटका

 

Pregnant Woman Diet | प्रेग्नंट महिलांनी 1 ते 9 व्या महिन्यापर्यंत काय खावे? आयुर्वेदात ‘हे’ आहेत परफेक्ट डाएट