Maharashtra MLC Election-2022 | ‘सत्तेचा माज चालणार नाही, आम्हीच जिंकणार, मला मुळीच चिंता वाटत नाही’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra MLC Election-2022 | राज्यसभेनंतर आता विधान परिषदेची (Maharashtra MLC Election-2022) रणधुमाळी सुरू आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होत आहे. यामध्ये बाजी कोण मारणार याकडे सर्व राज्याचे लक्ष लागून आहे. यातच आता राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी भाजपला (BJP) जोरदार इशारा दिला आहे. ‘महाराष्ट्राच्या शहाणपणापुढे केंद्राच्या सत्तेचा माज चालणार नाही, विधान परिषदेत आम्हीच जिंकणार. शेराला सव्वाशेर भेटतोच,’ असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त शिवसेनेच्या आमदारांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “उद्याची निवडणूक आमच्यात फूट पडू शकत नाही हे दाखविणारी आहे. महाराष्ट्र वेगळा विचार करू शकतो हे उद्या आपल्याला देशाला दाखवायचे आहे, असे आवाहनही त्यांनी शिवसेनेच्या आमदारांना केले. उद्याची निवडणूक आम्हीच जिंकणार,” असं ते म्हणाले. (Maharashtra MLC Election-2022)

 

“उद्या आम्हीच जिंकणार, मला मुळीच चिंता वाटत नाही. आता शिवसेनेत गद्दार मनाचा कुणी अजिबात राहिलेला नाही. सत्तेचा माज हवा असेल तर जा भाजपकडे; पण हे किती दिवस चालणार? आज मी शेर आहे, पण उद्या कुणीतरी सव्वाशेर येणार आहे. आत्ताचं राजकारण हे पावशेर आहे,” असा टोला त्यांनी लगावला. ‘मी मुख्यमंत्री असलो नसलो तरी काहीही फरक पडत नाही; पण उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हटल्यावर समोरचा माणूस आदराने उभा राहतो, हे कोणीही काढून घेऊ शकत नाही,” असं देखील ते म्हणाले.

दरम्यान, “राज्यसभेच्या निवडणुकीत आपले एकही मत फुटलेले नाही. मग फुटले कोणते तोही अंदाज लागला आहे. हळूहळू त्याचा उलगडा होत जाईल. मला फाटाफुटीची शक्यता अजिबात वाटत नाही. आपण फाटाफुटीचं राजकारण भोगत आलो; पण कितीही फाटले तरी शिवसेना अजून मजबुतीने उभी राहिली आहे. मला आईचं दूध विकणारा नराधम शिवसेनेत नको आहे, हे शिवसेनाप्रमुखांचे विधान आजही सर्वांच्या लक्षात आहे.” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

 

Web Title :- Maharashtra MLC Election-2022 | shivsena power will not run we will win cm uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा