×
Homeताज्या बातम्याMaharashtra MLC Election 2022 | भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य ! म्हणाले -...

Maharashtra MLC Election 2022 | भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य ! म्हणाले – ‘जे बाळासाहेबांचे विचार विसरले तेच आघाडीच्या उमेदवाराला मतदान करतील’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra MLC Election 2022 | उद्या 20 जून रोजी विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी मतदान होणार आहे. या 10 जागांसाठी एकूण 11 उमेदवार रिंगणात आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालीला वेग आला आहे. कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून सर्व प्रमुख पक्षांनी आपल्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलवर ठेवले आहे. शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज त्यांच्या आमदारांशी संवाद साधताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या एका वक्तव्याची आठवण करून दिली. या त्यांच्या वक्तव्यानंतर आता भाजपाकडून (BJP) त्यावर प्रतिक्रिया आली आहे. (Maharashtra MLC Election 2022)

 

पक्षाच्या आमदारांशी मुंबईतीला वेस्टइन हॉटेलमध्ये संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, आपण फाटाफुटीचे राजकारण भोगत आलो आहोत. पण कितीही फाटले, तरी शिवसेना अजून मजबुतीने उभी राहिली आहे, हे इतिहासाला आपण दाखवले आहे. अशीच फाटाफूट मागे झाली, तेव्हा शिवसेनाप्रमुख म्हणाले होते, मला आईचे दूध विकणारे नराधम शिवसेनेत नको. शिवसेनेत आता कुणीही गद्दार शिल्लक राहिलेला नाही. (Maharashtra MLC Election 2022)

 

उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर ताबडतोब भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हाच धागा पकडत वक्तव्य केले आहे. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)
यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना म्हटले की, भारतीय जनता पक्ष विजयासाठी निवडणूक लढवतो. ज्यांनी आमच्याशी विश्वासघात करून राज्यात सत्ता स्थापन केली तेच लोक आमदारांनी विश्वासघात केला, अशी वक्तव्ये करीत आहेत. शिवसेनेचे आमदार जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करणार नाही, असे म्हणत असेल तर त्यात त्यांचे काही चुकले नाही.

शिवसेनेचा (Shivsena) खरा आमदार कदापि काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मतदान करू शकत नाही. ज्यांना खुर्चीचे प्रेम आहे आणि जे बाळासाहेबांचे विचार विसरले असतील तेच आघाडीच्या उमेदवाराला मतदान करतील, असे मुनगंटीवार म्हणाले.

 

मुनगंटीवार पुढे म्हणाले की, भाजपाने विचारपूर्वकच राज्यसभेसाठी तीन उमेदवार उभे केले होते. आमदारांच्या सद्सदविवेक बुद्धीच्या आधारावर आमचा तिसरा उमेदवार निवडून आला. आता विधान परिषदेसाठीही आम्ही चमत्कारासाठी पाचवा उमेदवार उभा केला नाही, तर त्याच्या विजयासाठी नियोजन केले आहे. त्यामुळे आम्हीच विजयी होऊ, असे मुनगंटीवार म्हणाले.

 

विधान परिषद निवडणुकीसाठी गुप्त मतदान पद्धत असल्यामुळे घोडेबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यामुळे सर्वच पक्षांनी आपल्या आमदारांना वेगवेगळ्या पंचतारांकित हॉटेल्सवर ठेवले आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे.

 

Web Title :- Maharashtra MLC Election 2022 | those who forgotten balasaheb thackeray
will vote to maha vikas aghadi said sudhir mungantiwar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News